Caffeine Reduce Weight And Diabetes: युरोपियन संशोधकांनी १०,००० व्यक्तींच्या अनुवांशिक माहितीच्या अभ्यासावरून एक वेगळाच शोध लावला आहे. या अभ्यासानुसार रक्तातील कॅफिनची उच्च पातळी शरीरातील फॅट्सवर नियंत्रण ठेवू शकते, ज्यामुळे टाइप २ डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो. मॅक्स हेल्थकेअरमधील एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटिसचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मिथल यांनी सांगितले की या अभ्यासामुळे संशोधनासाठी एक नवीन मार्ग खुला झाला आहे. या अभ्यासातून समोर आलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया…

कॅफीन आणि डायबिटीजमधील संबंध काय? (Caffeine And Diabetes Link)

कॅफिनचा वापर नेहमीच वजन कमी करण्याशी जोडला गेला आहे. त्यामुळेच तुम्हाला वजन कमी करण्याच्या सर्व प्रकारच्या डाएटमध्ये कॅफिन समाविष्ट असलेले आढळून येईल. पण, रक्तातील कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो ही माहिती नवीन आहे.

nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

संशोधकांनी कॅफीन मेटाबॉलिझमचे अनुवांशिक मार्कर वापरले आहेत. अभ्यासकांनी कॉफीचा वापर आणि मधुमेहाच्या जोखमीचा मागोवा घेत या दोघांमधील संबंध शोधला आहे. कॅफीन मेटाबॉलिज्ममुळे बॉडी मास इंडेक्सशी कमी होण्यास मदत होऊ शकते. लठ्ठपणा हा टाइप २ मधुमेहाचा एक प्रमुख जोखीम घटक असल्याने, कमी BMI असल्‍याने अर्थातच त्याचा धोका कमी होईल असा अंदाज आहे. पण लठ्ठपणा हा जोखिमेचा फक्त ५० टक्के भाग आहे. इतर ५० टक्के जोखीम कमी कशामुळे होतो या अभ्यासाची गरज आहे.

कॅफिनमुळे वजन कमी होते का? (Can Coffee Reduce Weight)

कॅफिनमुळे शरीरातील ऊर्जा अधिक खर्च होते त्यामुळे वजन कमी होण्यास प्रोत्साहन मिळते. तज्ज्ञ सांगतात की, दररोज १०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन केल्याने पचनासाठी शरीरातील १०० कॅलरीज वापरल्या जाऊ शकतात.

कॉफीचे सेवन वाढल्याने मधुमेह टाळता येईल का?

अजिबात नाही. लक्षात घ्या हा अभ्यास कॅफीन चयापचय बद्दल आहे. सेवन केलेल्या प्रमाणाबद्दल नाही. कॅफिनयुक्त पेये अधिक प्रमाणात घेतल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची गती वाढू शकते, चिंता आणि अस्वस्थता येते, हाताचा थरकाप, निद्रानाश आणि डोकेदुखी होऊ शकते. याशिवाय, ते साखरेसह प्यायल्याने चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.

हे ही वाचा <<…म्हणून ताप येणे फायद्याचे ठरू शकते! शरीरात तापाने कसा बदल होतो सांगणारा रिसर्च एकदा वाचाच

कॉफी किंवा चहाचे सेवन किती प्रमाणात हवे? (How Much Tea Or Coffee is Too Much In a day)

ब्लॅक कॉफीच्या मोठ्या कपमध्ये सुमारे १०० मिलीग्राम कॅफिन असते. आणि चहामध्ये सुमारे एक तृतीयांश ते निम्मे प्रमाण असते (जे चहाच्या प्रकारावर अवलंबून असते) सरासरी भारतीय प्रौढ व्यक्ती दररोज सुमारे ३०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन करू शकतो. लक्षात घ्या तुम्ही जर आता कमी प्रमाणात कॉफीचे सेवन करत असाल तर ते वाढवणाची गरज नाही. ३०० मिलिग्रॅम हे कमाल प्रमाण आहे. तसेच, जर आपण आधीच चिंतेने ग्रस्त असतील किंवा हृदय विकारांचे धोका असेल, तर आपण दररोज सुमारे २०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन मर्यादित केले पाहिजे. अधिक कॉफी आणि चहा पिण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, जीवनशैलीतील बदलांवर काम करणे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि मधुमेह दूर ठेवण्यासाठी चांगले होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)