सकाळी उठल्यानंतर मूठभर भोपळ्याच्या बिया खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आहारतज्ज्ञ सल्लागार आणि डायबेटीस एज्युकेटर असलेल्या कनिका मल्होत्रा यांनी सांगितले की, भोपळ्याच्या बियांमध्ये आवश्यक पोषकतत्वे, जसे की मॅग्नेशियम, जस्त (झिंक), आणि लोह यांनी समृद्ध असतात ज्यांचे अनेक फायदे आहेत; जे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, पचनक्रिया आणि झोप सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
भोपळ्याच्या बिया खाण्याचे संभाव्य धोके
भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशिअम रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते, तर झिंक हे रोगप्रतिकारशक्ती आणि जखम भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच भोपळ्याच्या बिंयामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या ट्रिप्टोफॅन (अॅमिनो अॅसिडचा प्रकार) आणि मॅग्नेशिअम झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि मेलाटोनिन (हॉर्मोन्सचा प्रकार) निर्माण करण्यास मदत करते.
याशिवाय भोपळ्याच्या बिया अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असतात, तसेच त्यात असलेले व्हिटॅमिन इ आणि कॅरोटीनॉइड्स हे पेशींचा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते. तसेच या बियांमध्ये असलेले फायबर घटक पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते आणि नियमित पोट साफ होण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बिया या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण उपाय आहेत असे मल्होत्रा सांगतात. या बियांमध्ये असलेली आरोग्यदायी चरबी (healthy fats) आणि प्रथिनांमुळे पचनक्रिया मंदावते आणि परिणामी रक्तातील साखर हळू हळू सोडली जाते, ज्यामुळे अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही, म्हणूनच हे मधुमेही रुग्ण किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्यांसाठी फायदेशीर ठरते.
भोभोपळ्यांच्या बियांचा आणखी एक उल्लेखनीय फायदा पुरुषांच्या प्रोटेस्ट आरोग्यासाठी आहे, विशेषतः सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (BPH) असलेल्या वृद्ध पुरुषांसाठी. नियमितपणे भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास या स्थितीशी संबंधित लघवीची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
भोपळ्याच्या बिया खाण्याचे संभाव्य धोके
भोपळ्याच्या बियांचे अनेक फायदे आहेत, परंतु मल्होत्रा असा इशारा देतात की, “काही व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अॅलर्जी असलेल्या लोकांनी त्यांचे सेवन पूर्णपणे टाळावेत,” असेही त्या नमूद करतात.
याव्यतिरिक्त रक्त पातळ करणारे औषध घेणाऱ्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण भोपळ्याच्या बियांमध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात, जे औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतात. मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांनी त्याचे सेवन मर्यादित करावे, कारण भोपळ्याच्या बियांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या वाढू शकतात.
मल्होत्रा मोठ्या प्रमाणात मीठयुक्त भोपळ्याच्या बिया खाण्याबाबात देखील सल्ला देतात, विशेषतः जे त्यांच्या सोडियम सेवनावर लक्ष ठेवा. जास्त सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, विशेषतः जे उच्च फायबरयुक्त पदार्थांबद्दल संवेदनशील असतात त्यांना त्रास होऊ शकतो.
कोणत्याही आरोग्य ट्रेंडप्रमाणे, संभाव्य धोक्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे, विशेषतः जर तुम्हाला आधीच आरोग्य समस्या असतील तर सतक्त राहावे. जास्त प्रमाणात न वापरता त्यांच्या संपूर्ण आरोग्य फायद्यांचा आनंद घेण्यासाठी तुमच्या आहारात मीठ न लावलेले, कच्चे किंवा हलक्या भाजलेल्या भोपळ्याच्या बिया समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते.