हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया), दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (chronic kidney disease) अशा सर्व कारणांमुळे होणार्‍या मृत्यूमागे उच्च रक्तदाब हेच सर्वात महत्त्वाचे कारण असते, असे अलीकडेच एका संशोधनात लक्षात आले आहे. त्यामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA)ने त्याच्या व्यवस्थापनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

“सुरुवातीपासूनच उच्च रक्तदाबावर कठोरपणे उपचार करण्यावर या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भर दिला आहे. तसेच जीवनशैलीत बदल करून प्रतिबंधात्मक उपाय, प्रत्येक ट्रिगरचे परीक्षण आणि जर प्रतिबंधात्मक पावले अपयशी ठरली, तर औषधांची लवकर सुरुवात करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे,” असे मॅक्स हेल्थकेअरचे चेअरमन, कार्डियाक सायन्सेस विभागाचे डॉ. बलबीर सिंग यांनी सांगितले.

“इतर लोकसंख्येच्या तुलनेत भारतीयांना आनुवांशिकदृष्ट्या हृदयरोग लवकर होण्याची शक्यता असते हे लक्षात घेता, या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लवकर प्रतिबंध करण्यासाठी काही उपाय आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले.

रक्तदाब मोजण्याचे नवे प्रमाण काय? (What are the new blood pressure standards?)

रक्तदाब मिलिमीटर ऑफ मर्क्युरी (mm Hg)मध्ये मोजला जातो आणि तो दोन वेगवेगळ्या अंकांमध्ये नोंदवला जातो — ‘सिस्टोलिक’ (उच्च पातळी दर्शविणारा अंक) आणि ‘डायस्टोलिक’ (खालची पातळी दर्शवणारा अंक). सिस्टोलिक अंक हृदय रक्त पंप करताना निर्माण होणारा दाब दर्शवतो; तर डायस्टोलिक अंक हृदयाच्या ठोक्यांदरम्यान विश्रांती घेताना असलेला दाब दर्शवितो.

पूर्वी जेव्हा १३०/९० mmHg हे न्यू नॉर्मल (new normal) मानले जात होते, त्या तुलनेत AHA ने आता सामान्य रक्तदाब <१२० mmHg (सिस्टोलिक) आणि <८० mmHg (डायस्टोलिक) असे वर्गीकरण केले आहे.

“म्हणजेच आधीच्या सामान्य रक्तदाबाच्या आकडेवारीत घट झाली असून, ती आता १२०/८० mmHg पर्यंत कमी करण्यात आली आहे. आता आदर्श रक्तदाबाची पातळी ही ११५-११९/७०-७९ mmHg इतका असाला पाहिजे,” असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.

नवीन वर्गीकरणानुसार –

  • उच्च रक्तदाब (Elevated Blood Pressure) : सिस्टोलिक १२० ते १२९ mmHg आणि डायस्टोलिक <८० mmHg इतका आहे.
  • उच्च रक्तदाब पहिला टप्पा (Stage 1 Hypertension) : सिस्टोलिक १३० ते १३० mmHg किंवा डायस्टोलिक ८० ते ८९ mmHg इतका आहे.
  • उच्च रक्तदाब दुसरा टप्पा (Stage 2 Hypertension) : सिस्टोलिक ≥ १४० mmHg किंवा डायस्टोलिक ≥९० mmHg

“या आक्रमक बदलांचा मुख्य हेतू मेंदूचे आरोग्य आणि गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीशी संबंधित आहे. संशोधनात दिसून आले आहे की, उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे स्मरणशक्ती व इतर संज्ञानात्मक कार्यांवर परिणाम होतो,” असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.

रक्तदाबासाठी गोळ्या घेणे केव्हा सुरू करावे(When should a person start taking BP pills?)

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रक्तदाबाचा सिस्टोलिक अंक जर १३० ते १३९ mm Hg इतका असेल, तर जीवनशैलीत बदल करून रक्तदाब नियंत्रित करता येऊ शकतो. जर तुमचा रक्तदाब डायस्टोलिक ८० ते ८९ mmHg पेक्षा जास्त वाढला, तर किंवा जीवनशैलीत बदल करूनही रक्तदाब कमी झाला नाही, तर औषधोपचार घेण्यास सुरुवात करावी. एकदाच वापरता येईल अशा औषधाची शिफारस केली जाते. हे सहसा जेव्हा हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही तेव्हा हृदय बंद पडलेल्या रुग्णांना (heart failure patients) आपात्कालिन स्थितीमध्ये दिले जाते. उच्च रक्तदाबामुळे शरीरातील विविध अवयवांवर जास्त ताण (stress/दबाव) पडतो, असे डॉ. सिंह सांगतात.

जर रक्तदाब १४०/९० mm Hgपेक्षा जास्त वाढला असेल, तर मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन औषधे त्वरित देण्याची शिफारस केली जाते. कारण- एकदाच देता येणाऱ्या एकाच औषधाच्या मोठ्या डोसपेक्षा वेगवेगळी औषधे देऊन रक्तदाब कमी करणे ही जास्त प्रभावी आणि शाश्वत पद्धत आहे, असे डॉ. सिंह सांगतात.

उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी कोणत्या चाचण्या करण्याची शिफारस केली जाते (What tests have been recommended?)

नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन) नियंत्रित करण्यासाठी काही चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT), किडनी फंक्शन टेस्ट (KFT), सोडियम-पोटॅशियम संतुलन, युरिक ॲसिड व ब्लड शुगर प्रोफाइल्स.

“यावेळी मार्गदर्शक तत्त्वे मूत्रपिंड आणि हार्मोन्सकडेही लक्ष देत आहेत. युरिन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशो टेस्ट (किडनीचे आरोग्य तपासण्यासाठी) आणि अल्डोस्टेरोन-टू-रेनिन रेशो टेस्ट (हार्मोनमुळे होणारा विशिष्ट प्रकारचा उच्च रक्तदाब शोधण्यासाठी) या दोन चाचण्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या चाचण्या विशेषतः स्टेज २ हायपर टेन्शन असलेल्या रुग्णांसाठी आणि स्लीप ॲप्निया यासारखे इतर जोखमीचे घटक असणार्‍यांसाठी आवश्यक आहेत. मधुमेह, गर्भधारणा व किडनीचे आरोग्य यांवरून उपचार किती लवकर आणि किती आक्रमक पद्धतीने सुरू करायचे हे ठरते,” असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पोटॅशियमची भूमिका (मीठ असो किंवा आहारातून मिळणारे पोटॅशियम) रक्तदाब नियंत्रणात अत्यंत महत्त्वाची आहे. “AHA नुसार, पोटॅशियम-आधारित मिठाचे पर्याय (salt substitutes) उच्च रक्तदाब टाळण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिबंधात्मक उपाय काय? (What about prevention?)

AHA पुन्हा त्याच गोष्टी अधोरेखित करते, जेणेकरून लोकांनी त्या सातत्याने पाळाव्यात.

  • मिठाचे (सोडियम) सेवन कमी करा : दिवसाला २,३०० mg पेक्षा कमी मीठ खा आणि आदर्श मर्यादा १५०० mg पर्यंत ठेवा. त्यासाठी खाद्यपदार्थांवरील लेबल्स तपासणे महत्त्वाचे आहे.
  • धूम्रपान आणि मद्यपान मर्यादित करा : धूम्रपान थांबवा आणि मद्यपानावर मर्यादा ठेवा. त्या दृष्टीने पुरुषांनी दिवसाला जास्तीत जास्त दोन ड्रिंक्स आणि महिलांनी जास्तीत जास्त एका पेग जास्त मद्यपान करू नये.
  • तणाव कमी करा : ध्यान, श्वसन-व्यायाम (breath control), योग यांचा वापर करून तणाव कमी करा.
  • वजन कमी करा : किमान ५% वजन कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण करता येईल, असे ध्येय ठरवा.
  • व्यायाम : आठवड्याला किमान ७५ ते १५० मिनिटे व्यायाम करा. त्यात ॲरोबिक व्यायाम (उदा. कार्डिओ) किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग (उदा. वेट ट्रेनिंग) यांचा समावेश असावा.

उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारात -DASH diet (Dietary Approach to Stop Hypertension – DASH diet):

  • भाजीपाला, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा व बिया,
  • कमी फॅटयुक्त मांस, कोंबडी, मासे
  • कमी फॅट्सयुक्त पदार्थ खा.
  • घरच्या घरी नियमितपणे रक्तदाब मोजणे आवश्यक आहे.