बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. जेवणाच्या सवयी, झोपण्याची वेळ यामध्ये सतत बदल होत असल्यामुळे याचा परिणाम आरोग्यावर होतो. कामाचा ताण, डेडलाईन्स, वैयक्तिक समस्या यांमुळे ताण वाढण्याची शक्यता असते. ताण कमी करण्यासाठी अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. यासाठी सध्या स्टीम बाथ देखील ट्रेंडमध्ये आहे. अनेकजण स्टीम बाथचा पर्याय निवडतात. याचे आरोग्याला आश्चर्यकारक फायदे मिळतात. कोणते आहेत ते फायदे जाणून घ्या.

स्टीम रूम बाथ म्हणजे काय?
स्टीम रूम एक लहान रूम असते, ज्यामध्ये पाणी उकळुन त्याची वाफ तयार केली जाते. याचा वापर करून स्टीम बाथ घेतले जाते. स्टीम रूमचे तापमान ११०° F असते.

स्टीम बाथचे फायदे:

स्नायुंसाठी फायदेशीर
व्यायाम केल्यानंतर थकवा दुर करण्यासाठी खेळाडूंचा स्टीम बाथ घेण्यास प्राधान्य देतात. यामुळे स्नायूंना झालेली इजा किंवा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर
कोर्टीसोल हे तणाव निर्माण करणाऱ्या हॉर्मोनची निर्मिती स्टीम बाथमुळे कमी होते. यामुळे तणावात असणाऱ्या व्यक्तींना खुप फायदा होऊ शकतो. काही मिनिटांचा स्टीम बाथ मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

रक्ताभिसरण नीट होण्यास मदत मिळते
स्टीम बाथमुळे रक्ताभिसरण नीट होण्यास तसेच रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळु शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
स्टीम बाथ घेतल्याने ल्युकोसाईट्स उत्तेजित होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्वचा चमकदार करते
स्टीम बाथ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्र (पोअर्स) उघडण्यास आणि त्वचेतील टॉक्सिक पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते. यामुळे त्वचा चमकदार बनते.