What Is Water Intoxication : पुरेसे पाण्याचे सेवन केल्याने निरोगी राहण्याबरोबरच केस, त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. पण, तुम्हाला माहीत आहे का, की जास्त पाणी पिण्याने उलट परिणामसुद्धा होऊ शकतात? उदाहरणार्थ- ४० वर्षांच्या एका व्यक्तीचे उदाहरण घ्या; ही स्री ‘डिटॉक्सिफिकेशन’साठी (Water Intoxication) सकाळी भरपूर पाणी प्यायली. पण, त्याचा परिणाम जीवघेण्या समस्येमध्ये (life-threatening complication) झाला.

सुश्री रजनी (वय ४०) हिला तिचे शरीर डिटॉक्स करण्यासाठी सकाळी पाणी पिण्यास सांगितले होते. सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्याने त्या स्रीच्या शरीरातील सर्व कचरा निघून जाईल आणि ती निरोगी होईल. त्याशिवाय तिची त्वचाही चमकदार दिसेल, असा दावा केला जात होता. रजनीने हा सल्ला खूपच गांभीर्याने घेतला आणि सकाळी उठल्यानंतर ती सुमारे चार लिटर पाणी प्यायली. त्यानंतर एक तासाच्या आत तिला डोकेदुखी, मळमळ व उलट्या झाल्या. काही मिनिटांनंतर ती गोंधळून गेली आणि दिशाहीन झाली. त्यानंतर तिला चक्कर आली आणि तिचे भान हरपले,” असे हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटल्सच्या सल्लागार व न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांनी एक्स (ट्विटर)वर सांगितले.

Healthy Lifestyle Tips
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ‘या’ ४ गोष्टींची काळजी; अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Car washing tips these parts should be prevented from water while washing the car
कार धुताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होईल लाखो रुपयांचं नुकसान! ‘या’ भागांमध्ये पाणी गेलं तर गाडी होईल कायमची खराब
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
water intake
पाणी कसे व किती प्यावे?
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?

तिला तातडीने आपत्कालीन कक्षेत (emergency room) नेण्यात आले. हे बहुधा हायपोनेट्रेमिया (रक्तातील सोडियमची पातळी कमी होणे) वॉटर इंटॉक्सिकेशनमुळे (water intoxication) झाले होते. रक्त तपासणीतून डॉक्टरांच्या संशयाची पुष्टी केली गेली. सीरम सोडियम पातळी ११० mmol/L (सामान्य: 135-145) होती. सुश्री रजनी यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आणि पुढील तीन दिवसांत हायपोनेट्रेमिया दुरुस्त करण्यात आला. तिने उपचारांना प्रतिसाद दिला आणि २४ तासांच्या आत तिची मानसिक स्थिती सामान्य झाली. तिला चौथ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला,” असे डॉक्टर सुधीर कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा…Seema Sajdeh : सीमा सजदेहने सांगितली स्किनकेअरमधली खास गोष्ट; त्वचेला चमकदार बनवणारा हा ट्रेंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात…

पोस्ट नक्की बघा…

यातून आपल्याला काय समजते? (Water Intoxication)

डॉक्टर कुमार यांनी नमूद केले की,
१. डिटॉक्सिफिकेशनसाठी (Water Intoxication) सकाळी जास्त पाणी पिण्याची गरज नाही. मूत्रपिंड नैसर्गिकरीत्या मूत्राद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. फक्त एक सामान्य हायड्रेशन स्थिती आवश्यक आहे.

२. दररोज २.५ ते ३.५ लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते, जी दिवसभर शरीरात पसरले पाहिजे. दैनिक पाण्याच्या गरजेपैकी सुमारे २० टक्के अन्न (विशेषत: फळे) आणि इतर पेये (जसे की दूध, चहा, ज्यूस इ.)पासून देखील पूर्ण होते, असे डॉक्टर कुमार म्हणाले आहेत.

३. वय, लिंग, तापमान, आर्द्रता, व्यायाम व कॉमोरबिड आजारांवर अवलंबून पाण्याची आवश्यकता बदलू शकते.

४. डॉक्टर कुमार यांनी सांगितले की, निरोगी मूत्रपिंड जास्त पाण्याचे सेवन हाताळू शकते. पाण्याचे सेवन १.५ लिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास वॉटर इंटॉक्सिकेशन होऊ शकते (हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते).

५. वॉटर इंटॉक्सिकेशन (water intoxication) गंभीर हायपोनेट्रेमिया झाल्यास त्वरित ओळखा आणि उपचार लवकर सुरु करा. तुमचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकते.

वॉटर इंटॉक्सिकेशन (Water Intoxication) म्हणजे काय आणि ते ‘जीवघेणे’ का?

याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, मुंबईच्या परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार, इंटर्नल मेडिसिन, डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, वॉटर इंटॉक्सिकेशन किंवा हायपोनेट्रेमिया सामान्यतः जेव्हा तुम्ही काही तासांत खूप पाणी पिता तेव्हा होतो. हे तुमच्या मूत्रपिंडासाठी चांगले नाही. कारण – ते जास्तीचे पाणी लवकर काढून टाकू शकत नाही. त्यामुळे सोडियमची पातळी तुमच्या रक्तप्रवाहात खालावू शकते. तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करणे, मज्जातंतू, स्नायूंचे योग्य कार्य राखणे यांसारख्या विविध शारीरिक कार्यांसाठी सोडियम महत्त्वपूर्ण आहे; असे डॉटर मंजुषा अग्रवाल म्हणाल्या आहेत.

डॉटर मंजुषा अग्रवाल यांच्या मते, यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये द्रव जमा होऊ शकतो. वॉटर इंटॉक्सिकेशन वारंवार होत नाही ते दुर्मीळ असते. मॅरेथॉनसारख्या लांब वर्कआउट्ससाठी ॲथलीट स्वत:ला ओव्हरहायड्रेट करू शकतात, काही वजन कमी झाल्यामुळे किंवा डिटॉक्सच्या ट्रेंडमुळे आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे जास्त पाणी पिण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबरोबर असे होऊ शकते.

वॉटर इंटॉक्सिकेशन आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतो. कारण – पातळ सोडियममुळे पेशी सुजतात. डॉक्टर अग्रवाल म्हणाले की, मेंदूला सूज आली, तर ते धोकादायक आहे. कारण – त्यावर त्वरित उपचार न केल्यास कोमा, फिट येणे किंवा मृत्यू यांसारख्या गंभीर समस्यासुद्धा होऊ शकतात. डोकेदुखी, मळमळ, थकवा व गोंधळ यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. म्हणूनच सक्रिय पावले उचलणे आणि पिण्याच्या पाण्याबाबत सुरक्षा सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा, असे डॉटर मंजुषा अग्रवाल म्हणाल्या आहेत.

Story img Loader