आपल्यापैकी बहुतेकांची सकाळ ही एक कप चहा, कॉफी किंवा स्मूदीने होते. हे गोड पदार्थ असल्याने ते सकाळी उठल्यानंतर प्यावे की पिऊ नये यावरून गोंधळ आहे. अनेकजण आरोग्याविषयी जागरुक असल्याने ते याबाबत खूप काळजी घेतात.आपल्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने साखरेचे सेवन धोकादायक मानले जाते, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरचे सेवन हे अधिक धोकादायक असते. पण साखरेला आता गूळ, मध आणि ब्राउन शुगर हे पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण यातील कोणता प्रकार तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे जाणून घेऊ…

साखरेला पर्याय म्हणून यातील एक पदार्थ निवडण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. ती म्हणजे, या सर्व प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात सारखेच असते. फक्त याची पौष्टिक रचना आणि प्रक्रियांमध्ये थोडाफार फरक असतो, हे फक्त आम्हीच नाही, तज्ञही तेच सांगतात.

साखर, ब्राऊन शुगर, गूळ हे सर्व पदार्थ ऊसापासून तयार होतात हे तर सगळ्यांना माहितच असेल. पण यातील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले आहे.

आंबा गोड आहे की आंबट कसा ओळखायचा? फक्त ‘या’ ३ ट्रिक्स लक्षात ठेऊन आंबा खरेदी करा

ऊसाच्या रसापासून तयार होणारी साखर आणि गूळ हे मोलॅसिसपर्यंतचे अंतिम शुद्ध उत्पादन आहे. तर ब्राउन शुगर देखील रिफाइंड केलेली असते, परंतु त्यातील मोलॅसिस वेगळे केले जाते, पण याच गुळ नंतर टाकले जाते. म्हणूनच त्याचे पौष्टिक गुणधर्म थोडे वेगळे आहेत, असतात असे ती म्हणाली.

कॅलरीजबद्दल बोलताना आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, तुम्ही एक चमचा साखर घ्या, ब्राउन शुगर किंवा गूळ घ्या, हे तिन्ही पदार्थ जवळपास समान कॅलरीज प्रधान करतात. साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. साखर किंवा ब्राउन शुगरच्या तुलनेत गुळामध्ये लोहन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.

याशिवाय अगदी वेगळ्या स्त्रोतातून (मधमाशी) मिळणारे मध देखील तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज पुरवतात. परंतु त्यात काही ट्रेस मिनरल्स असतात.

यातील कोणता पदार्थ आपण निवडला पाहिजे?

हे सर्व गोड पदार्थांमध्ये गोडपणा एक समान गुणधर्म आहे.यामुळे त्यापैकी कोणताही पदार्थ निरोगी आरोग्यासाठी चांगला ठरतो असे म्हणता येणार नाही. कारण सर्वांमध्ये समान कॅलरीज आहेत, तसेच काही पोषक घटक देखील आहेत. पण मध आणि गुळात ट्रेस मिनरल्स असतात.

नोएडामधील इंटरनल मेडिसिन-फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक आणि प्रमुख डॉ. अजय अग्रवाल म्हणाले की, गुळात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ साखरेच्या तुलनेत गुळामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी गूळ एक चांगला पर्याय आहे. परंतु साखर, गुळ, ब्राऊन शुगर, मध यातील कोणता प्रकार निवडायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.

ब्राऊन शुगर आणि साखर यातील कोणताही प्रकार चव आणि पोत यावर अवलंबून असेल. एखाद्या पदार्थात जिथे कॅरमेलची चव हवी असेल तिथे ब्राउन शुगर हा चांगला पर्याय आहे. कारण साखर खूप गोड असते, जी कॅरमेलची चव देऊ शकत नाही, असे डॉ अग्रवाल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर आहारतज्ज्ञांनी पुढे असेही म्हटले की, आपण यापैकी कोणत्याही गोड पदार्थांचा तुम्ही अतिवापर तर करत नाही याची खात्री करून घेण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.