टाकळा ही वनस्पती पावसाळ्यामध्ये उपलब्ध होते. इतर पालेभाज्यांप्रमाणेच दिसणारी ही भाजी वास्तवात पूर्वापारपासून पावसाळ्यात खाण्याचा प्रघात होता. अशावेळी मनात प्रश्न पडतो, “पावसाळ्यामध्ये टाकळा का “? आणि या प्रश्नाचे उत्तर शोधताना जी वैज्ञानिक तथ्ये समोर येतात, ती समजल्यावर निसर्गाच्या किमयेने मन थक्क होते.

पावसाळ्यामध्ये शरीर अशक्त होते आणि शरीराला ताकदीची गरज असते. ताकद वाढवण्यासाठी हवी असतात प्रथिने. प्रथिनांचा स्त्रोत म्हणजे दूध-दही,त्याची उपलब्धता पावसाळ्यात तशी कमीच असते. त्यामुळे शरीराला प्रथिने पुरवायची तर मांस-मासे वगैरे मांसाहार करायला हवा. पण मांसाहाराचा तर पावसाळ्यात आयुर्वेदशास्त्रानेच नव्हे तर धर्मशास्त्रानेसुद्धा निषेध केला आहे. मग शरीराची प्रथिनांची गरज कशी भागवायची? त्याचे उत्तर आहे,’टाकळा’.

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं

आणखी वाचा: Health Special: श्रावणात उपास करताय आणि ‘हे’ पदार्थ खाताय?

१०० ग्रॅम टाकळ्याच्या भाजीमधून शरीराला तब्बल २०.७ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात, त्यातही सुक्या भाजीमधून! टाकळ्यामधून मिळणार्‍या प्रथिनांचे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर कोणत्या पदार्थामधून किती प्रथिने मिळतात,त्याची तुलना करून पाहा. दूध(गाय):३.२, दूध(म्हैस): ४.३,दही : ३.१, अंडे : १३.३, बकर्‍याचे मांस : २१.४,पापलेट(पांढरे) : १७,सुरमई : १९.९,कोलंबी : १९.१.आता तुमच्या लक्षात आले असेल की टाकळ्यामधून मिळणार्‍या प्रोटिन्सचे प्रमाण बरेच जास्त आहे,तेसुद्धा प्राणिज नव्हे तर वनस्पतीज.प्राणिज प्रथिनांच्या तुलनेमध्ये वनस्पतीज प्रथिने पचायला हलकी व आरोग्यासाठी हितकर समजली जातात.( Nutritive value of Indian foods,p 49)

टीप: वरील पोषण ताज्या टाकळ्यापेक्षा सुक्या टाकळ्यामधून अधिक मिळते,हे लक्षात ठेवावे.

आणखी वाचा: Health Special: उपवास (लंघन) का करावा?

टाकळ्यामधून मिळते भरपूर कॅल्शियम!

टाकळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य ज्यामुळे पावसाळ्यामध्ये टाकळा खाणे शरीराला हितकर होते, ते म्हणजे टाकळ्यामधील कॅल्शियम. पावसाळ्यामधील ओलसर-कुंद वातावरणामध्ये संभवणार्‍या हाडांच्या आणि सांध्यांच्या तक्रारींमध्ये शरीराला गरज असते कॅल्शियमची. विविध कारणांमुळे शरीराला या दिवसांमध्ये कॅल्शियमची कमी भासू लागते आणि हाडे व सांध्यांच्या तक्रारी अजूनच बळावतात, त्यावरचे प्रभावी औषध म्हणजे ’टाकळा’.१०० ग्रॅम टाकळ्याच्या ताज्या भाजीमधून ५२० कॅल्शियम मिळते तर सुक्या भाजीमधूनही मिळते. थोडेथोडेके नाही तर तब्बल ३२०० मिलिग्रॅम!

शरीराची रोजची गरज असते, साधारण ८०० ते १००० मिलिग्रॅम, वाढत्या वयाच्या मुलामुलींना, गर्भार व स्तनपान करणार्‍या स्त्रियांना अधिक. ही गरज पावसाळ्यात अधूनमधून टाकळ्याची भाजी खाल्ली तर सहज भरून निघेल. प्राणीज स्वरुपात कॅल्शियम घेण्यास घाबरणार्‍या मंडळींकरता तर टाकळा म्हणजे वरदानच आहे. हाडांना आवश्यक असणारे फॉस्फरससुद्धा टाकळ्यामधून २९२ एमजी मिळते आणि मुबलक प्रमाणात इतर खनिजे सुद्धा! याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अ जीवनसत्त्व (बीटा-कॅरोटिन) ताज्या टाकळ्यामधून १०,१५२ यूजी इतक्या भरपूर प्रमाणात आणि शरीराला उर्जा देणारी चरबीसुद्धा ३.९ ग्रॅम इतक्या प्रमाणात मिळते. शरीराला विविध जैवरासायनिक कामामध्ये अत्यावश्यक असणारी खनिजे सुक्या टाकळ्यामधून ११.७ इतक्या मुबलक प्रमाणात मिळतात. एकंदरच टाकळा म्हणजे पोषणाचे आगारच आहे. मला तर वाटते, जुन्या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्या पोषणाची निसर्गाने केलेली तजवीज म्हणजे टाकळ्यासारख्या पालेभाज्या.