गेल्या काही वर्षांत नॉन-अल्कहॉलिक फॅटी लिव्हर डिसिज (NAFLD) विरुद्धच्या लढाईत कॉफी एक आश्चर्यकारक पर्याय म्हणून ओळखला जातो आहे. ही स्थिती यकृतामध्ये फॅट्स जमा झाल्यामुळे निर्माण होते, ज्याचा जास्त मद्यपानाशी कोणताही संबंध ना. संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून कॉफीचे सेवन आणि NAFLD विकसित होण्याचा धोका कमी होणे यांच्यातील एक आशादायक दुवा उघड केला आहे. ज्यामुळे यकृताच्या आरोग्यासाठी कॉफी पिण्याच्या फायद्यांवर प्रकाश टाकला आहे. यकृत, विविध चयापचय प्रक्रियांसाठी जबाबदार असलेला एक महत्त्वाचा अवयव आहे; ज्याचे खराब आहार, लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैली यांसारख्या घटकांमुळे नुकसान होऊ शकते, हे सर्व NAFLD ची सुरुवात होण्यास आणि विकसित होण्यात योगदान देते. अशा स्थितीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने कॉफी हे एक संभाव्य ढाल म्हणून काम करते आहे, जे यकृताच्या कार्यावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या आणि NAFLD चा सामना करणाऱ्या अनेक यंत्रणा निर्माण करते. NAFLD चा धोका कमी करण्यात कॉफीची भूमिका अभ्यासकांनी सिद्ध केल्यामुळे याबाबत अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना कॉफीच्या सेवानाचे फायदे सांगितले आहेत. कॉफी यकृताचे संरक्षण कसे करते? कॉफीमधील मुख्य घटकांपैकी एक असलेले कॅफिन, हे मध्यवर्ती मज्जासंस्थेला (nervous system) उत्तेजित करते आणि असंख्य शारीरिक प्रतिक्रियांना (biological responses) चालना देते. हे फॅट्सच्या चयापचयासाठी एंजाइम सक्रिय करून फॅट्सचे विघटन वाढवते. या प्रक्रियेमुळे यकृताच्या पेशींमध्ये फॅट्स जमा होणे टाळता येते, जे NAFLD ची स्थिती विकसित होणे टाळते. त्याचबरोबर कॅफीनमुळे पित्त निर्माण होते, फॅट्सच्या पचनास मदत होते आणि शरीरातून त्याच्या उत्सर्जनाची प्रक्रिया सुलभ होते, ज्यामुळे यकृतावरील भार कमी होतो. पण, यकृताच्या आरोग्यासाठी कॉफीच्या संपूर्ण उपचारात्मक क्षमतेसाठी केवळ कॅफीनच नव्हे, तर काही अँटिऑक्सिडंट्सदेखील उपयुक्त आहेत. विशेषत: क्लोरोजेनिक ॲसिड आणि पॉलिफेनॉल हे अँटीऑक्सिटडंट्स, जे कॉफीच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ही संयुगे हानिकारक फ्री रॅडिकल्स काढून टाकतात, यकृताच्या ऊतींमधील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करतात. NAFLD च्या विकासामध्ये दोन्ही घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय हे अँटिऑक्सिडंट्स इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात, संभाव्यत: इन्सुलिन रेझिटन्सचा धोका कमी करतात, जो NAFLD विकासाचा एक सामान्य पूर्व संकेत म्हणून ओळखला जातो. जेव्हा शरीर कॅफीन पचवते तेव्हा ते पॅराक्सॅन्थिन (Paraxanthine) नावाचे रसायन निर्माण करते, जे फायब्रोसिसमध्ये (Fibrosis) स्कार टिश्यूच्या वाढीस मंद करते. स्कार टिश्यू म्हणजे ज्यामध्ये कोलेजन नावाचे कठीण तंतुमय प्रथिने असतात, जे शरीर जेव्हा जखम बरी करते तेव्हा तयार होते. हे 'लिव्हर कॅन्सर' (fight liver cancer), 'अल्कोहोल रिलेडेट सिरोसिस'(Alcohol-related cirrhosis), 'नॉन-अल्कोहोल-रिलेटेड फॅटी लिव्हर डिसिज' (Non-alcohol-related fatty liver disease) आणि 'हिपॅटायटीस सी' (Hepatitis C)या समस्यांसह लढण्यास मदत करू शकते. हेही वाचा - तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…. अभ्यासानुसार कॉफी पिणे किती सुरक्षित आहे? निरीक्षणात्मक अभ्यास आणि क्लिनिकल चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांवरून हे स्पष्ट झाले की, कॉफीचे सेवन आणि NAFLD विकसित होण्याचा धोका कमी होण्यामधील संबंध किती प्रमाणात सेवन केले जाते यावर अवलंबून आहे. दररोज सुमारे दोन ते तीन कप कॉफी पिणाऱ्यांमध्ये कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत NAFLD चे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. तरीसुद्धा प्रत्येकाचे वैयक्तिक प्रतिसाद भिन्न असू शकतात आणि संयम महत्त्वाचा आहे; कारण जास्त प्रमाणात कॅफीन सेवन केल्याने हृदयाची गती वाढणे आणि चिंता वाढणे यांसारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात NAFLD टाळण्याशिवाय कॉफीचे यकृतासाठी इतर फायदेशीर गुणधर्म यकृतसंबंधित स्थिती सुधारण्यास मदत करतात. अभ्यासातून असे दिसून आले की, "नियमित कॉफी पिण्यामुळे 'लिव्हर सिरोसिस, उशिरा ज्ञात झालेला लिव्हर डिसिजचा धोका कमी करू शकतो, जो बऱ्या न होणाऱ्या डागांमुळे लक्षात येतो." याव्यतिरिक्त कॉफीमधील दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट प्रभावांमुळे त्याचा यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याशी संबंध जोडला जातो. हेही वाचा - Diwali 2023 : दिवाळीमध्ये फराळावर ताव मारताय? आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात… कॉफी पिताना संयम असावा कॉफी पिताना या सावधगिरीच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तुमच्या कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे याकडे लक्ष द्या. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषत: जेव्हा तुम्हाला आधीपासूनच कोणताही आजार असेल तेव्हा. कॉफी आणि यकृत याच्या आरोग्यासंबंधित संशोधन आवश्यक आहे, जे यकृतसंबंधित रोगांशी लढण्यासाठी नवीन दृष्टिकोन देण्याचे आश्वासन देते. शास्त्रज्ञांनी या गुंतागुंतीच्या संबंधाचा सखोल अभ्यास केल्यामुळे, कॉफी ही सकाळी उठल्यावर पिण्यासाठी उत्तम पर्याय आहेच, पण त्याचबरोबर आपल्या यकृताचे रक्षण करणारे एक शक्तिशाली अमृतदेखील असू शकते हे दिसून येते.