नवी दिल्ली : कमी वेतन आणि कामाच्या तणावामुळे पुरुषांना हृदयरोगाचा दुप्पट धोका असतो. ‘जर्नल सक्र्युलेशन कार्डीओव्हॅस्क्युलर क्वालिटी आऊटकम्स’मध्ये प्रकाशित संशोधानात याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संशोधक मॅथिल्डे लविग्ने -रोबिचोड यांनी सांगितले की, नोकरीच्या ठिकाणी व्यतीत केलेला महत्त्वाचा वेळ लक्षात घेऊन नोकरीतील तणाव आणि हृदयाचे आरोग्य यांच्यातील संबंध जाणून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> Health Special: आरोग्याचा श्रीगणेशा कसा कराल? वजन कमी करण्याचा मंत्र कोणता?

आमच्या संशोधनानुसार कमी वेतन आणि कामामुळे तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला अन्य पुरुषांच्या तुलनेत हृदयरोगाचा ४९ टक्के अधिक धोका असतो. संशोधकांनी २००० ते २०१८ या कालावधीत सुमारे ६ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती गोळा केली होती. तिचे विश्लेषण करण्यात आले. या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ४५ वर्षे होते. रोबिचोड यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणी असलेला तणाव कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा पुरुषांवर चांगला परिणाम झाला. त्यांच्या आरोग्यात सुधारणाही दिसून आली. तर, महिलांमध्येही अशा प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर कमी वेतन आणि कामाच्या तणावाचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.