scorecardresearch

Monkeypox संदर्भात WHO ची मोठी घोषणा! आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, त्वरित वापरण्याचे केले आवाहन

Monkeypox Renamed as Mpox: आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, जाणून घ्या..

Monkeypox संदर्भात WHO ची मोठी घोषणा! आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, त्वरित वापरण्याचे केले आवाहन
फोटो: प्रातिनिधिक

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सोमवारी कोरोना विषाणूनंतर कहर करणार्‍या मंकीपॉक्स या आजाराचे नाव बदलून mpox असे केले. संघटनेचे म्हणणे आहे की, जेव्हा या आजाराचा प्रादुर्भाव जगभर पसरू लागला तेव्हा वर्णद्वेषी, भेदभावपूर्ण आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात होती. याबाबत संस्थेला माहिती देण्यात आली आणि अनेक देशांनी नाव बदलण्याची सूचनाही केली, त्यानंतरच संस्थेने चिंता व्यक्त करत नाव बदलले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की दोन्ही नावे सुमारे एक वर्ष वापरली जातील आणि नंतर मंकीपॉक्स हे नाव टप्प्याटप्प्याने बंद होईल.

मंकीपॉक्सला हे नाव देण्यात आले कारण डेन्मार्कमध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये हा विषाणू मूळतः १९५८ मध्ये ओळखला गेला होता. ब्रिटनमध्ये जेव्हा त्याचा प्रसार होऊ लागला तेव्हा अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात माकडांना विष देऊन मारले गेले, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस म्हणाल्या, ‘मंकीपॉक्स प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो, परंतु माकडे यासाठी जबाबदार नाहीत. जावे.’ त्यांनंतर डब्ल्यूएचओने नवीन नावासाठी समर्पित वेबसाइटसह लोकांची मदत घेतली जिथे कोणीही नाव सुचवू शकत होते.

( हे ही वाचा: ‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या)

मंकीपॉक्सची पहिली केस मे महिन्यात समोर आली होती आणि आता त्याने भारतासह जगभरात आपला थैमान माजवला आहे. तज्ज्ञांचा असाही विश्वास होता की यामुळे मृत्यू होत नाही, परंतु या आजाराची लागण झालेल्या लोकांचा मृत्यूही होऊ लागला आहे. जगभरात मंकीपॉक्सची ८०,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ५५ मृत्यूची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:01 IST

संबंधित बातम्या