World TB Day 2023: २४ मार्च १८८२ रोजी जर्मन जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) या क्षयरोगाच्या विषाणूचा शोध लावला होता. त्यांच्या यामुळे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे २४ मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ साजरा केला जातो. या निमित्ताने जगभरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या क्षयरोग दिनाची थीम ‘Yes! We can end TB’ ही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षयरोग या महाभयंकर रोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये क्षयरोगामुळे तब्बल १.५ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता. हा आजार संसर्गजन्य स्वरुपाचा असतो. म्हणजेच श्वासामार्ग क्षयरोगाचे विषाणू शरीरामध्ये प्रवेश करत असतात. हा आजार प्राथमिक स्तरावर असतानाच त्यासंबंधित उपचार करणे आवश्यक असते. वेळीच उपाय केल्याने क्षयरोग बरा होऊ शकतो असे म्हटले जाते. परंतु क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याबद्दलची माहिती आज आम्ही देणार आहोत.

क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

क्षयरोगाच्या आजाराने सध्या जगातील असंख्य लोक त्रस्त आहेत. या रोगाने पीडीत असलेल्या रुग्णाच्या मनामध्ये ‘आपण पूर्णपणे बरे होऊ का?’ असा विचार सतत येत असतो. यावर भाष्य करताना जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. निमिष शाह म्हणतात की, “वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग अस्तित्त्वात आहेत. त्यातील क्षयरोग हा सर्वात गंभीर असला तरी, त्यावर योग्य उपचार केल्याने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुर्देवाने क्षयरोग होण्यासाठी कारणीभूत असलेले विषाणू विकसित झाले आहेत. त्यामुळे उपलब्ध उपचारांना प्रतिरोधक असलेल्या क्षयरोगाने लोक प्रभावित होत आहेत. अशा परिस्थितीमध्येही आजारी व्यक्तीची काळजी घेतल्यास, योग्य प्रकारे उपचार केल्यास सुधारणा होऊ शकते.”

ते पुढे म्हणाले, “क्षयरोग हा संसर्गजन्य विषाणूंमुळे होत असतो. त्यामुळे स्वच्छता राखल्याने यापासून स्वत:चा बचाव करता येतो. या आजारासाठी कारणीभूत असलेले विषाणू हवेद्वारे पसरतात. अशा वेळी मास्क लावणे फायदेशीर ठरु शकते. सर्दी, खोकला ही क्षयरोगाची लक्षणे असली तरी, यामुळे आजारी पडल्यास एखाद्याला क्षयरोग झाला आहे असे म्हणता येत नाही. पण दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालवधी सर्दी-खोकला येत असेल, तर डॉक्टराकडे जाऊन तपासणी करवून घेणे आवश्यक असते.”

आणखी वाचा – World TB Day 2023: जीवनशैलीमध्ये ‘हे’ बदल केल्याने टाळता जाऊ शकतो क्षयरोग, जाणून घ्या सविस्तर

वातावरणातील बदल आणि आजूबाजूला क्षयरोगाने पीडित असलेल्या रुग्णाच्या सहवासात राहिल्याने हा आजार बळावतो. जर एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही संसर्ग झाला असेल, तर त्याला क्षयरोग होण्याचा धोका असतो. मधुमेहामुळेही हा आजार होण्याची शक्यता असते. जास्त लोकसंख्या असलेल्या भागामध्ये क्षयरोगाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असा वेळी मास्क व सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World tuberculosis day 2023 is tb fully curable all you need to know about it yps
First published on: 24-03-2023 at 11:06 IST