Bajaj आणि TVS नंतर आता देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी Hero Motocorp इलेक्ट्रिक स्कुटरच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर Hero Duet E लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर सर्वप्रथम वर्ष 2016 च्या ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केली होती. Duet E येत्या काही महिन्यांमध्ये बाजारात उतरवली जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय बाजारात या स्कुटरची थेट टक्कर काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या बजाज चेतक आणि TVS iQubeइलेक्ट्रिक स्कुटरसोबत होईल, असं मानलं जात आहे. या दोन्ही स्कुटर जानेवारी महिन्यातच बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. चेतक ही स्कुटर अर्बन आणि प्रीमियम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये असून अनुक्रमे एक लाख आणि एक लाख 15 हजार इतकी एक्स-शोरुम किंमत आहे. तर, टीव्हीएस आयक्यूबची बेंगळुरूमध्ये ऑनरोड किंमत 1.15 लाख रुपये आहे.

हीरोने 2016 च्या ऑटो एक्सपोमध्ये ही स्कुटर सादर केली होती, त्यावेळी सिंगल चार्जमध्ये 65 किलोमीटर रेंज असल्याचं सांगितलं होतं. तसेच ही स्कुटर 6.5 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते असा दावा केला होता. आता चेतक आणि TVS iQube मुळे हिरो आपली इलेक्ट्रिक स्कुटर अपडेट करुन अधिक रेंजसह बाजारात उतरवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा – ‘बजाज चेतक’ला TVS iQube ची टक्कर, पाच हजारांत बुकिंगला सुरूवात

ड्युअल-टोन कलरसह ग्रीन ग्राफिक्स :
स्कुटरच्या फ्रंट आणि साइड पॅनल्सवर ग्रीन कलरचे ग्राफिक्स आहेत. हीरो ड्युएटच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये दिलेले फ्युअल-फिलर कॅप रिप्लेस करुन त्याजागी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. हीरो ड्युएट-ई इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये अँटी-थेफ्ट आणि बाइक फाइंडर सिस्टिम यांसारखे फीचर्स आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero may launch duet e electric scooter soon sas
First published on: 30-01-2020 at 14:14 IST