Hair highlighting: रंगीत, कलरफुल हेअर कलर सध्या बरेच ट्रेंडमध्ये आहेत. हेअर कलर केल्याने काही मिनिटांतच तुमचा लूक बदलतो शिवाय तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढतो.ज्यांचे केस पांढरे नाहीत, त्यांनाही वेगवेगळ्या शेड्स देऊन केसांना नवा लुक द्यायचा आहे. यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यात भरपूर रसायने असतात. त्यामुळे अनेक वेळा तुमचे केस खराब होतात. काही केसांचे रंग इतके हार्ड असतात की ते तुमच्या टाळूला इजा करू शकतात. त्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन गळू लागतात. जर तुम्हाला या सर्व समस्या टाळायच्या असतील तर केसांना कलर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

केसांना हेअर कलर करणं तर सोपं आहे. पण, त्या केसांची योग्य काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे.

Swelling in Ankles
घोट्याला सूज येण्याची ६ मुख्य कारणे लक्षात ठेवा; किडनी, हृदय व यकृतालाही ठरू शकतो धोका, ‘हे’ सोपे उपाय उतरवतील सूज
Swelling on Face In Morning
झोपेतून उठताच तुमचा चेहरा सुजलेला दिसतो का? ‘ही’ ६ कारणं वाचून ठेवा, सूज कमी करायची तर आधी हे उपाय कराच
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
If bikers follow these important rules
बाईकचालकांनी ‘या’ महत्त्वाच्या नियमांचे पालन केल्यास बाईक दीर्घकाळ राहील व्यवस्थित
This is what happens to the body when you shift your dinner time from 9 pm to 6 pm
रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
Gut, Stomach Infection Home Remedies
अल्सरचा त्रास, पोटही बिघडतंय? जिरं, ओवा व ‘या’ मसाल्याचा वापर देईल चुटकीसरशी आराम; खाण्याची योग्य पद्धत वाचा
are you addicted your favourite lip balm then read what doctor said
तुम्हालाही ओठांना सतत लिप बाम लावण्याचे व्यसन तर नाही ना? काय होतात परिणाम? वाचा डॉक्टरांचे मत….
Five must-follow steps to rescue flooded car
पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी

टाळूवर कलर करणे टाळा

केसांना कोणताही रासायनिक रंग लावण्यापूर्वी टाळूवर कलर करणे टाळा. जर रंग तुमच्या टाळूमध्ये शोषला गेला आणि तुमच्या रक्तप्रवाहात मिसळला गेला तर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. डाईंग केल्यानंतर तुमची टाळू चांगली धुतली जाईल याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

ऍलर्जी चाचणी किंवा पॅच चाचणी करा

तुमच्या केसांवर केमिकल हेअर डाय वापरण्याची ही तुमची पहिलीच वेळ असल्यास, नेहमी तुमच्या केसांच्या छोट्या भागावर त्याची चाचणी करा. जर ते तुम्हाला खाज सुटणे, जळजळअशा कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही हेअर डाई वापरू नये. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि त्यानंतरच हेअर डाय वापरा.

केस हायलाइट करण्याचे तोटे

केसांना हायलाइट करणं ही आता फॅशन झाली आहे. परंतु केस कलर करण्यापूर्वी, त्याचे तोटे जाणून घेणे आवश्यक आहे. केसांना हायलाइट करण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात, ज्यामुळे केस कमकुवत आणि कोरडे होतात. केसांना पुन्हा-पुन्हा हायलाइट केल्याने केस गळतात आणि नवीन केस वाढण्यास त्रास होतो.

केस निर्जीव होतात

जर तुम्हाला तुमचे केस हलके काळे रंगवायचे असतील तर तुम्हाला ब्लीचिंग करावे लागेल. ब्लीचिंग केसांसाठी जास्त धोकादायक मानले जाते. केसांना हायलाइट करताना वापरलेले केमिकल केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकते आणि त्यांना निर्जीव बनवते. केसांना स्टाइलिंगची गरज असते पण जास्त स्टाइल केल्यामुळे केसांचं नुकसान होतं.

ऍलर्जीची शक्यता

इतकेच नाही तर काही लोकांना केस हायलाइट केल्यानंतर जळजळ, लालसरपणा आणि टाळूला खाज सुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये असलेल्या रसायनांमुळे ऍलर्जी होते. असे होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हायलाइट केलेल्या केसांना महागड्या शॅम्पू आणि कंडिशनर्सची आवश्यकता असते ज्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. काही लोक त्यांच्या केसांना घरी हायलाइट करतात, परंतु असे केल्याने केसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा >> उन्हाळ्यात बाहेरुन आल्यावर लगेच थंडगार पाणी पिताय? थांबा! होऊ शकतो गंभीर परिणाम

या गोष्टी लक्षात ठेवा

घरी केस हायलाइट करू नका, कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हायलाइट केलेल्या केसांची काळजी घ्या आणि शॅम्पू वापरा. केस हायलाइट करण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.