Home Remedies to Reduce Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल (Cholesterol) ही गंभीर समस्या बनली आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते. रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आवश्यक आहे. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त, तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. काही घरगुती उपाय करुनही तुम्ही रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकता, चला पाहूया कोणते आहेत, हे घरगुती उपाय…

१. लसूण

लसूण ही एक नैसर्गिक वनस्पती आहे जी त्याच्या उत्कृष्ट आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी वापरली जाते. आपल्या स्वयंपाकात याचा वापर जास्त प्रमाणात होतो. शरिरास हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. यासाठी दररोज २ ते ३ लसूणाच्या पाकळ्या जरुर खाव्यात.

२. अक्रोड

रोज सकाळी तुम्ही चार अक्रोड खाल्ल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले कोलेस्ट्रॉल वितळते आणि तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल पुन्हा यकृतापर्यंत पाठविण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही रोज किमान चार अक्रोडचे सकाळी सेवन करु शकता. 

(हे ही वाचा: मासिक पाळीमध्ये चुकूनही करू नका ‘या’ ५ पदार्थांचे सेवन; अन्यथा होऊ शकतात असह्य वेदना )

३. मेथीचं पाणी

मेथीचं पाणी देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरते. मेथीत असे काही गुणधर्म आढळतात ज्यामुळं खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळं रोज एक कप मेथीच्या पाण्याचं सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

४. ओट्स

आहारात ओट्स असणं फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो.

नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन चांगले जीवन जगता येते. म्हणून नियमित व्यायामही केला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून ‘लोकसत्ता’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)