Homemade utane: दिवाळी सणाची सुरुवात होते ती अभ्यंगस्नानानेच. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे असते. दिवाळी सण म्हणजे रोषणाई, सजावट, दिव्यांची आरास, रांगोळी, फराळ यांसोबत सुगंधी उटणेही तितकेच महत्वाचे असते. विविध सुंगधीत आणि औषधी वनस्पती वापरुन उटणे यार करतात. आपल्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी उटणे व तेल अंगाला लावून मगच अभ्यंगस्नान केले जाते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरात उटणं हे घरीच बनवलं जात असे. सध्या बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे उटणे विक्रीसाठी उपलब्ध असतात. बाजारात मिळणाऱ्या या उटण्यांमध्येही बऱ्याचदा काही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता ही असते. अशावेळी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी घरच्या घरीच तयार केलेले उटण्यांचा वापर केला तर ते अधिक फायदेशीर ठरते.

तुम्ही उटणे खरेदी करता का? यंदा उटणे खरेदी करू नका तर घरी बनवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घरच्या घरी उटणे कसे बनवायचे, त्यासाठी आम्ही तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहोत. तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही घरीच उटणे तयार करू शकता.

घरचं उटणं बनवण्यासाठी साहित्य

  • बेसन, चंदन पावडर
  • गुलाबाच्या फुलांची पावडर
  • केशर, हळद,आणि तांदळाचं पीठ

ही सर्व सामग्री बाजारात सहज मिळते आणि आपल्या त्वचेसाठी लाभदायक आहे. बेसन आणि तांदळाचं पीठ त्वचेला स्क्रबिंग करून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतं, तर चंदन आणि गुलाब त्यात सुगंध आणतात.

सर्व साहित्य एकत्र करून त्यात योग्य प्रमाणात पाणी किंवा गुलाबजल मिसळा. तुम्ही ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार अॅडजस्ट करू शकता. कोरडी त्वचा असल्यास दूध किंवा मध देखील मिसळू शकता. हे मिश्रण तयार करताना ते घट्ट आणि पेस्ट सारखं असावं याची काळजी घ्या, जेणेकरून वापरताना ते अंगावर चांगलं लागेल.

​हळद- तिळाचं उटणं Ubtan Recipe in marathi

साहित्य –

एक चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे तीळ, आवश्यकतेनुसार पाणी

कृती –

मिक्सरच्या भाड्यांमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र घेऊन वाटून घ्या. पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. उटणे तयार झाल्यानंतर चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर अंग स्वच्छ धुवा. या उटण्याच्या वापरामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार होतो.

चेहऱ्यासाठी तिळाचे लाभ :
तिळात फॅटी अ‍ॅसिड असतात जे त्वचेला नैसर्गिक मॉइश्चराइझर देतात. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, डार्क स्पॉट्स आणि मुरुमांची समस्या कमी होते.

हळदीचे फायदे :
हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असल्याने झटपट त्वचेवर नैसर्गिक तेज येते आणि पिंपल्सही जातात. हळदीने चेह-यावर एक वेगळीच चमक व ग्लो येतो.

उटणं कसं लावावं

स्नानाच्या वेळी उटणं ओल्या अंगावर चोळून हलक्या हाताने मालिश करा. हे तुमच्या त्वचेला स्वच्छ करून नितळ करेल. काही मिनिटं तसेच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. उटणं वापरल्यानंतर तुमच्या शरीराला एक सुगंधित आणि फ्फ्रेश अनुभव मिळेल. तर अशा प्रकारे यंदा दिवाळीत या सोप्या पद्धतीने घरचं उटणं बनवा आणि नैसर्गिकरित्या आपल्या त्वचेला नवा आनंद द्या.

उटणं लावण्याचे फायदे

  • त्वचा कोरडी पडत नाही
  • उटणात असलेली आंबेहळद आणि तिळाचं तेल त्वचा मऊ ठेवतात आणि नैसर्गिक ओलावा टिकवतात.
  • त्वचा उजळते
  • मसूर डाळ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि चेहऱ्याची कांती उजळवते.
  • अंगावरील केस दूर होतात
  • उटणं घासून काढल्याने अंगावरील हलके केस निघतात आणि त्वचा गुळगुळीत होते.