Honor 9N launched in India Flipkart sale from July 31 know Price specifications features: हुवाईचा सबब्रॅण्ड असणाऱ्या ऑनर कंपनीने आज दिल्लीमधील एका शानदार सोहळ्यामध्ये आपला नवा ऑनर ९ एन हा फोन लॉन्च केला. नॉच डिस्प्ले ही या फोनचे वैशिष्ट्य असून हा फोन केवळ फ्लिपकार्ट या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

तीन प्रकारांमध्ये उपलब्ध

ऑनर ९ एन हा फोन तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पहिल्या प्रकारचा सर्वात स्वस्तातील म्हणजेच ३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणारा दुसरा ४ जीबी रॅम/ ६४ जीबी इंटर्नल मेमरी आणि तिसरा सर्वात महाग असणार हा फोन ४ जीबी रॅम/ १२८ जीबी इंटर्नल मेमरी या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

विक्री

हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या वेबसाईटवरून विकत घेता येईल. ३१ जुलैला दुपारी १२ वाजल्यापासून या फोनची विक्री सुरु होईल. तसेच ऑनर कंपन्यांच्या औपचारिक स्टोअर्समध्येही हा फोन ३१ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल असे कंपनीने सांगितले आहे.

रंग

मिडनाईट ब्लॅक, लॅव्हेंडर पर्पल, सफायर ब्लू आणि रॉबिन एग ब्लू या चार रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

विशेष ऑफर

विशेष लॉन्च ऑफर अंतर्गत हा फोन विकत घेणाऱ्यांना रिलायन्स जिओ कडून दोन हजार २०० रुपये कॅशबॅक देण्यात येईल. तसेच १०० जीबी डेटा आणि एक हजार २०० रुपयांचे मिंत्राचे व्हाउचर्स मोफत देण्यात येतील.

स्पेसिफिकेशन्स:

> स्क्रीन
५.८४ इंच फूल एचडी स्क्रीन

रेझेल्यूशन
१०८०X २२८० पिक्सल

स्क्रीन अॅस्पेक्ट रेशो
१९.९

> मेमरी

मोबाईल ३ जीबी, ४ जीबी रॅमच्या तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असून इंटर्नल स्टोअरेजच्या दृष्टीनेही ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
मेमरी कार्डच्या सहाय्याने फोनची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

> कॅमेरा

फोनमध्ये १३ आणि २ मेगापिक्सलचे दोन रेअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसहीत देण्यात आले आहेत.

या दोन्ही रेअर कॅमेरांना Bokeh इफेक्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पीडीएएफसारखे फिचर्सही कॅमेरात देण्यात आले आहेत.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे

> कनेक्टीव्हीटी

४ जी व्होल्ट

वाय-फाय

ब्लू टूथ

जीपीएस

> इतर फिचर्स

फोनच्या समोरच्या भागावर फिंगरप्रिंट सेंसरचे विशेष बटण देण्यात आले आहे.

मोबाईलमध्ये कंपनीने किरीन ६५९ हा चीपसेट दिला आहे.

या फोनमध्ये फेस अनलॉकचे फिचरही देण्यात आले आहे.

नोटिफिकेशन प्रायव्हसी हे अनोखे फिचरही या फोनमध्ये देण्यात आले आहे. या फिचरमुळे केवळ फोनच्या मालकालाच फोनचे नोटिफिकेशन दिसू शकतील.

> किंमत

३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी – ११ हजार ९९९ रुपये

४ जीबी रॅम/ ६४ जीबी इंटर्नल मेमरी – १३ हजार ९९९ रुपये

४ जीबी रॅम/ १२८ जीबी इंटर्नल मेमरी – १७ हजार ९९९ रुपये

हा फोन एमआय नोट फाइव्ह प्रो आणि आसुस झेफोन मॅक्स प्रो एम वन सारख्या फोन्सला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवण्यात आला असल्याचे जाणकारांचे मत आहे.