Right Time for Second Pregnancy After C-section: आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना असते. मातृत्व ही प्रत्येक स्त्रीसाठी नितांत सुंदर अनुभूती असते. प्रसूतीनंतर नवीन आईच्या आयुष्यात अनेक प्रकारची आव्हाने येतात. जेव्हा पहिली डिलिव्हरी सिझेरियन (C-Section) होते, तेव्हा सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती लवकर पुढील गर्भधारणेचे नियोजन करावे? या प्रश्नाबाबत बहुतेक महिला संभ्रमात राहतात. दुसऱ्यांदा गर्भधारणा कधी करावी? पुन्हा सिझेरियनच करावे लागेल का? नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. एशियन हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार प्रसूती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उषा प्रियंबदा यांनी याबाबत माहिती दिली आहे. सविस्तर जाणून घेऊया…

एका महिलेची किती वेळा सिझेरियन प्रसूती होऊ शकते?

तज्ज्ञांनी सांगितले की, एका महिलेची ३-४ वेळा सिझेरियन प्रसूती होऊ शकते. परदेशातील महिलांची जास्त सिझेरियन प्रसूती होते, परंतु भारतातील महिलांची फक्त ३-४ वेळा सिझेरियन प्रसूती होते.

सिझेरियन डिलिव्हरीनंतर वारंवार C-Section करणे कितपत सुरक्षित?

वारंवार सिझेरियन डिलिव्हरी केल्यास महिलेसाठी धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते, जितक्या वेळा सिझेरियन केला जातो, तितक्याच वेळा रुग्णाच्या शरीरात बरे होण्याची प्रक्रिया कमकुवत होत जाते. सिझेरियनचा भाग हळूहळू कमकुवत होत जातो, त्यामुळे टाके फाटण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञ सांगतात की, ओव्हन नाल (प्लेसेंटा) ला अशी सवय असते की जिथे जिथे जुन्या शस्त्रक्रियेचे (सर्जरीचे) खुणा असतात तिथेच जाऊन चिकटते. ही एक अत्यंत धोकादायक परिस्थिती असते कारण यामुळे महिलेला जीवघेणा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्लेसेंटा हळूहळू टिचांची जागा आणि मूत्राशयाच्या थैलीला नुकसान पोहोचवतो, जे आणखी गुंतागुंतीचे आणि धोकादायक ठरते.

सिझेरियन डिलिव्हरीनंतर दुसऱ्या गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या मते, पहिली सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर किमान तीन वर्षांचे अंतर ठेवणे आवश्यक असते. हे अंतर शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी, विशेषतः गर्भाशयावरचे टाके मजबूत होण्यासाठी आवश्यक असते. यामुळे दुसऱ्या गर्भधारणेमध्ये गुंतागूंत टाळता येते.

C-सेक्शननंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

काही महिलांमध्ये दुसऱ्यांदा VBAC (Vaginal Birth After Cesarean) म्हणजेच सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य असते. पण, हे शरीराची स्थिती, बाळाची पोझिशन आणि आधीच्या डिलिव्हरीचे कारण यावर अवलंबून असते, त्यामुळे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सी-सेक्शननंतर किती वेळाने हालचाल सुरू करावी?

आजकालच्या तंत्रज्ञानामुळे सी-सेक्शननंतर लगेचच हालचाल सुरू करणे शक्य होते, यामुळे शरीर वेगाने सावरते. एक दिवस विश्रांतीनंतर महिला हलकी कामे करू शकतात. अत्यंत जास्त विश्रांतीमुळे उलट गुंतागूंत निर्माण होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिझेरियननंतर आहार कसा घ्यावा?

सिझेरियन डिलिव्हरीनंतर हळूहळू आणि संतुलित आहार घेणे आवश्यक असते. पनीर, डाळी, दूध, अंडी, मांसाहारी प्रथिनं, सुकामेवा, फळं, भाजीपाला यांचा आहारात समावेश करावा. तूप, तेलकट पदार्थ आणि अवजड जेवण टाळावे. शरीरात गॅस, ॲसिडिटी होणार नाही याची काळजी घ्यावी.