स्वयंपाक करणे हा आपल्या रोजच्या जीवनशैलीतील एक भाग आहे. आपल्यापैकी अनेकांना स्वयंपाकाची आवड असते. स्वयंपाक करणे वाटते तितके सोप नाही बरं का? स्वयंपाक ही कला आहे जी जोपासावी लागते. स्वयंपाक करणे शिकताना अनेक गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. आता सोपं उदाहरण सांगायचे झाले तर नुसती भाजी करायची म्हटले तरी त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. कधी सुकी भाजी केली जाते, कधी मसाला वाटण घालून रस्सा भाजी केली जाते. आता वाटणं म्हटलं तर त्यातही वेगवेगळे पद्धतीचे वाटणं असते आणि वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. पुर्वी खलबत्यामध्ये कुटून किंवा पाट्यावर मसाला वाटून वाटण केले जात आता त्याची जागा मिक्सरने घेतली आहे. कोणतंही वाटण करायचं झाल की, चुटकीसरशी तयार होते. स्वयंपाक घरात पाट्याची जागा मिक्सर घेतल्यामुळे आपला बराच वेळ वाचतो. स्वयंपाकघरात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते त्यात मिक्सरची साफसफाई करणे मात्र तेवढचं किचकट काम.

अनेकदा वाटण करताना कितीही काळजी घेतली तरी मिक्सर खराब होतो. कधी वाटण सांडते तर कधी मिक्सरच्या भांड्यातून जास्तीचे पाणी येते. अनेकदा मिक्सरचे झाकण नीट लागले नाही तर मिक्सरच्या भांड्याच्या आतील वाटण बाहेर उडते. किंवा वाटणात पाणी जास्त झाले तर घट्ट झाकण लावले तरी ते बाहेर येते. त्यामुळे मिक्सर खराब होते. वेळीच सफाई केली नाही तर हे डाग सुकतात आणि कडक होतात. मग कितीही प्रयत्न केले तरी निघत नाही. काळजी करू नका ही छोटीशी ट्रिक तुम्हाला मिक्सरची सफाई करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा – तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा

मिक्सरची सफाई कशी करावी.

मिक्सरची सफाई करताना मिक्सरच्या आत पाणी जाऊ याची काळजी घ्यावी लागते अन्यथा मिक्सर खराब होऊ शकतो. म्हणून सर्व प्रथम मिक्सरच्या आत पाणी जाऊ शकते अशा ठिकाणी चिकटपट्टी लावून घ्या . उदा. मिक्सरचे बटण इ.

हेही वाचा – Kitchen jugad Video: भेंडीची भाजी कधी बर्फ टाकून बनवलीये का? परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

त्यानंतर एका स्प्रेच्या बाटलीत थोडे व्हिनेगर घ्या, भाडी घासण्याचे लिक्विड घ्या आणि त्यात थोडे पाणी टाका.. तुमचे सफाई करण्याचे मिश्रण तयार आहे.

आता मिक्सरवर स्प्रे करा आणि स्वच्छ पुसून घ्या. ब्रश आणि चमचा वापरू शकता जेणेकरून कोपऱ्यामध्ये साचलेली घाण निघेल

मिक्सरवर असलेले सर्व हट्टी आणि चिकट डाग चुटकी सरशी निघून जातील.

टिप – तुम्ही व्हिनेगरऐवजी लिंबाचा रस वापरू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंस्टाग्रामवर priya_dwarke या खात्यावर ही व्हिडीओ ट्रिक शेअर केली आहे. तुम्ही स्वत: ही ट्रिक वापरून पाहा किती उपयूक्त आहे ते ठरवा.