आजकालच्या तरुणांना, कामाचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा फार पटकन ताण येतो. ताण आला कि त्यासोबत विविध समस्यासुद्धा बरोबर येतात. त्यापैकी एक म्हणजे केस पांढरे होणे. उन्हाचा त्रास, योग्य पोषण, योग्य आणि सकस आहार न घेणे, केसांना तेल न लावणे, यासारख्या गोष्टींमुळेदेखील व्यक्तीचे केस लवकर पांढरे पडू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र यावर अतिशय साधे आणि सोपे उपाय सोशल मीडियावरील @click4su नावाच्या अकाउंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिने केस पांढरे का होतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार आपले केस सुंदर होण्यासाठी, पांढरे न होण्यासाठी कोणते उपाय आहेत ते पाहा.

हेही वाचा : Hair care tips : केस घनदाट अन् चमकदार होण्यासाठी ‘या’ चार तेलांची होईल मदत; जाणून घ्या फायदे….

केस अवेळी पांढरे का होऊ शकतात?

१. पोषण घटकांची कमतरता

तुमचा आहार सकस आणि चौफेर नसल्यास शरीराला पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते. अशात जर बी १२, अमिनो ऍसिड, प्रथिने, या घटकांच्या अभावामुळे केस पांढरे होऊ शकतात.

२. धूम्रपान

आपल्या संपूर्ण शरीरासाठी, आरोग्यासाठी धूम्रपान करणे हे किती त्रासदायक आणि धोकादायक असते हे आपल्याला माहिती असेलच. मात्र अति धूम्रपान केल्यानेदेखील केस लवकर पांढरे होऊ शकतात.

३. अनुवंशिकता

जर तुमच्या आई-वडिलांचे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचे केस लवकर पिकले असतील तर त्यांच्याकडून, ही अनुवांशिक गोष्ट तुमच्याकडे आलेली असू शकते. परिणामी तुमचे केस लवकर पांढरे होऊ शकतात.

मात्र तुमचे वय खूपच कमी असेल आणि आत्तापासून तुमच्या डोक्यावर भरपूर पांढरे केस असतील तर नक्कीच जवळच्या डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी @click4su या अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावरील पिंपल काही केल्या जाईना? ‘या’ पाच आयुर्वेदिक गोष्टी करतील तुमची मदत…

केस पांढरे होण्यापासून कसे थांबवावे?

१. आवळा तेल

अंघोळीआधी, खोबरेल तेलामध्ये आवळ्याचा अर्क एकत्र करून ते तेल केसांच्या मुळाशी लावून घ्या. हलक्या हाताने मुळांना मसाज करा. साधारण ३० ते ४५ मिनिटांनंतर केस धुवून घ्या.

२. कोरा चहा

तुमच्या केसांच्या लांबीनुसार, कोरा चहा तयार करून घ्या. यासाठी पातेल्यात पाणी तापवून त्यामध्ये केवळ चहा पावडर घालून घ्या. तयार चहा गार झाल्यानंतर तो आपल्या संपूर्ण केसांना एक तासभर लावून ठेवा. नंतर केस धुवून टाका.

३ कडीपत्ता हेअर मास्क

कडीपत्त्याची ताजी पाने घेऊन त्यांची एक पेस्ट बनवून घ्या. या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळून सर्व लेप तुमच्या केसांवर ३० ते ४५ मिनिटांसाठी लावून ठेवावा. नंतर केस कोमट पाण्याने धुवून घ्या.

४. एरंडेल आणि मोहरीचे तेल

एरंडेल आणि मोहरीचे तेल एकत्र करून त्याने तुमच्या केसांच्या मुळाशी मसाज करा. या दोन तेलांचे तयार मिश्रण केसांच्या मुळाशी ३० ते ४५ मिनिटांसाठी लावून ठेवावे.

५. मेथी दाणे

भिजवलेल्या मेथी दाण्यांची एक बारीक अशी पेस्ट बनवून घ्या. त्या पेस्टमध्ये दुसरा कोणतीही पदार्थ न घालता सरळ केसांच्या मुळाशी ३० ते ४५ मिनिटांकरिता लावून ठेवा. त्यानंतर केस कोमट पाणी आणि एखादा सौम्य शम्पू वापरून घुवून घ्या.

हेही वाचा : Video : ‘गव्हाचे चुरमुरे’ तयार होताना कधी पहिले आहेत का? व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा…

६. मेहेंदी आणि कॉफी

मेहेंदीचा उपयोग आपल्या केसांसाठी होतो हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र पांढरे केस कमी करण्यासाठी कॉफी आणि मेहेंदी पावडर एकत्र करून त्याचा एक हेअर मास्क बनवून घ्या. हा हेअर मास्क केसांवर ३ ते ४ तासांसाठी लावून ठेवा.

७. आवळा आणि जास्वंद

आवळा आणि जास्वंददेखील आपल्या केसांची देखभाल करू शकतात. यासाठी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून त्याची एक पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी साधारण ३० ते ४५ मिनिटांसाठी लावून ठेवा.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @click4su या अकाऊंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ५.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधिरीत असून कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get rid of premature grey hair naturally use this seven simple and easy tips check out dha
First published on: 19-01-2024 at 23:01 IST