How To Make Bhaji- Pakoda Less Oily: उन्हाळा, पावसाळा, थंडी अगदी कुठलाही सीझन असू द्या आपण वडे- भजी हे तळलेले पदार्थ आवर्जुन खातो. अगदी डाएट करणारी मंडळीही भले हेल्दी भाजीची का होईना पण भजी खाणे पूर्ण बंद करत नाहीत. आता आपण आवडीने भज्या खाताना कितीही नाही म्हंटल तरी खूपच तेलकट आहे बाई असा विचार डोक्यात येतोच ना. अनेकदा तर तळताना भजी-वड्यांनी अधिक तेल शोषून घेतल्यास चव सुद्धा बिघडते. अधिक तेल खाणे म्हणजे मग पुन्हा कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, फॅट्स एका मागोमाग एक अशी आजारांची लाईनच लागते. हे सर्व काही टाळण्यासाठी आणि तुमच्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी आज आपण जास्त तेल न शोषता वडे- भाज्या कशा तळायच्या याच्या टिप्स पाहणार आहोत…

वडे व भज्या तेलकट नव्हे तर कुरकुरीत करतील ‘या’ १० टिप्स

  • १) नॉनस्टिक कढईचा वापर करा.
  • २) तेल नीट गरम होऊ द्या, तेल पूर्ण तापल्याशिवाय भजी- वडे त्यात सोडल्यास तेल अधिक शोषले जाते.
  • ३) तेलात चिमूटभर मीठ घालून मग भज्या- वडे तेलात सोडावेत. खारटपणा उतरू नये यासाठी भज्यांचे मिश्रण करताना त्यात किंचित मीठ कमी घातले तरी चालेल.
  • ४) बेसन लावून भजी तळताना अनेकदा बेसनाचा थर अधिक जाड होतो. लक्षात घ्या याने तुम्हाला भजीची मूळ चव चाखता येणार नाही आणि तेलही अधिक शोषले जाते. हे टाळण्यासाठी बेसनमध्ये एक (फार फार दोन वेळाच) भजी किंवा वडा घोळवून मग तेलात सोडावा.
  • ५) तुम्हाला जर डीप फ्राय करायचेच असेल तर मग तुम्ही कढईत पुरेसे तेल घ्या. कमी तेलात अनेकदा पदार्थ शिजायलाच प्रचंड वेळ लागतो आणि त्यामुळे तेल जास्त शोषले जाते. अन्यथा शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करा.
  • ६) शक्य असल्यास पदार्थ टाळण्याआधी किंचित उकडवून किंवा उकळून घ्या जेणेकरून त्याला तेलात शिजायला लागणारा वेळ कमी होतो परिणामी तेल कमी शोषले जाते.

हे ही वाचा<< …म्हणून तुमचं वजन कमी होत नाही! डाएट व जिम सोडून ‘या’ ५ कारणांवर डाएटिशियन देतात भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ७) तळलेला पदार्थ आधी स्वच्छ टिश्यूवर ठेवून त्याला हलकं दाबून घ्या.
  • ८) प्रयोग म्हणून तुम्ही अप्पमच्या भांड्यात सुद्धा भज्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता.
  • ९) भांड्याचा तळ खोलगट व मोठा असल्याने तेल गरम होते. जेव्हा तेलाचे तापमान स्थिर असते तेव्हा त्यात भजी, वडे व्यवस्थित तळून होतात. अधिकचे तेल शोषून घेतले जात नाही.
  • १०) बेसनच्या बॅटरमध्ये आपण थोडासा बेकिंग सोडादेखील घालू शकतो. बेकिंग सोडा घातल्याने हे बॅटर एकदम हलके – फुलके बनेल.

तुम्ही पण या टिप्स वापरून बिनधास्त भज्यांवर ताव मारू शकता. बाकी यातील कुठली टीप तुम्हाला जास्त आवडली हे कमेंट करून कळवा.