लठ्ठपणा या समस्येने आजकाल अनेकजण त्रस्त असतात. खाण्याच्या चुकीच्या सवयी, जेवणामध्ये जंक फूडचा भडीमार, पुरेसा व्यायाम न करणे या कारणांमुळे वजन लगेच वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते. याच कारणांमुळे मोठ्यांप्रमाणे लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांचे वजन नियंत्रित राहावे याची पालकांना चिंता सतावत आहे. लहान मुलांचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काही टिप्स मदत करू शकतात, कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

लहान मुलांचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी टिप्स

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात

मुलांना शारीरिक हालचाल होणाऱ्या गोष्टी करण्यास सांगा
लहान मुलांना एका ठिकाणी बसून व्हिडीओ गेम्स खेळायला आवडते. याची त्यांना सवय लागते, त्यामुळे ते बाहेर जाऊन शारीरिक हालचाल होणारे खेळ खेळायला कंटाळा करतात. यामुळे एका ठिकाणी बसून त्यांचे वजन वाढते. हे टाळण्यासाठी मुलांना शारीरिक हालचाल होणाऱ्या गोष्टी करण्यास सांगावे. डान्स, व्यायाम अशा गोष्टी करण्यासही सांगू शकता.

जंक फूड टाळा
घरातील पौष्टिक जेवणापेक्षा लहान मुलांना बाहेरचे जंक फूड खाणे प्रचंड आवडते, असे तेलकट पदार्थ खाल्ल्यानेच त्यांचे लगेच वजन वाढते. म्हणून लहान मुलांचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्यांनी जंक फूड खाणे टाळावे.

आणखी वाचा: तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून लगेच मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत

नाश्ता टाळू नये
लहान मुलांचा सकाळी काहीही खायला नकार असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा नाश्ता टाळला जातो. पण यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. नाश्ता न केल्याने दिवसभरात सतत भूक लागून काहीतरी खात राहिल्याने वजन वाढू शकते. हे टाळण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा नाश्ता मुलांना द्यावा, ज्यामुळे त्यांना दिवसभरातील कामं करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळेल.

मुलांना पुरेशी झोप घेण्यास सांगावे
पुरेशी झोप न घेणे देखील मुलांचे वजन वाढण्यामागचे कारण असु शकते. त्यामुळे मुलांना पुरेशी झोप घेण्यास सांगावे. ७ ते ८ तासांची योग्य प्रमाणात झोप घेतल्यास मुलांना फ्रेश आणि उत्साही राहण्यास मदत मिळेल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)