How To Sleep When BP Is High: उच्च बीपीच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत सुरुवातीपासूनच बीपी नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे असते. यावेळी प्रत्येक लहान सवयी तुम्हाला बीपी नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडू शकतात, जसे की तुमचा आहार आणि तुमची झोपेची योग्य पद्धत. झोपेबद्दल बोलायला गेलो तर झोपताना पायांच्या दिशेने रक्त परिसंचरण खूप जलद होते. यामुळे तुम्हाला तुमच्या पायात दाब आणि पायांमध्ये अस्वस्थता जाणवू शकते. अशा परिस्थितीत झोपण्याच्या योग्य पद्धतीचा उपयोग केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. कसे ते जाणून घ्या..

ब्लड प्रेशर करण्यासाठी कोणत्या बाजूला झोपावे?

जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर रक्तदाब कमी करण्यासाठी डाव्या बाजूला झोपा. डाव्या बाजूस झोपणे रक्तदाबासाठी योग्य स्थिती आहे कारण यामुळे हृदयाला रक्तप्रवाह करणाऱ्या वाहिन्यांना आराम मिळतो, आणि यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

( हे ही वाचा; मोमोज खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा Momos खावे)

उच्च रक्तदाबासाठी उशी कशी ठेवावी?

हाय बीपीच्या समस्येमध्ये पायाखाली उशी ठेवून झोपणे फायदेशीर मानले जाते. तुम्ही जेव्हा पायाखाली उशी ठेवता त्याने बीपी कमी होऊ लागतो आणि रक्ताभिसरणाला आराम मिळतो. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित होतो. ज्यामुळे पायांची अस्वस्थता कमी होते आणि तुम्ही हाई बीपीची समस्या टाळू शकता.

याशिवाय जर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी झोपताना सैल मोजे घातले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे बीपी संतुलित होईल आणि नंतर शरीरातील रक्त परिसंचरण सुधारेल. त्यामुळे चांगली झोप लागेल आणि हाय बीपीची समस्या आपोआप नियंत्रणात येईल.