How To Use Sheet Mask : स्किनकेअर रूटीनमध्ये शीट मास्क (Sheet masks) सिंगल यूज स्किनकेअर प्रॉडक्ट आहे. शीट मास्क त्वचेला हायड्रेशन, पोषण व चेहरा फ्रेश दिसण्यास मदत करतो. पण, शीट मास्कचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्याचा योग्य रीतीने वापर करणेसुद्धा आवश्यक आहे. तर प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ निरुपमा परवंदा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्वचातज्ज्ञ म्हणतात, “जर शीट मास्क योग्यरीत्या वापरला, तर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढू शकतात.”
शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत…
शीट मास्क रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा (Refrigerate Sheet Mask)
शीट मास्क लावण्यापूर्वी काही मिनिटांसाठी तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. त्यामुळे मास्कच्या प्रभावात लक्षणीय फरक पडू शकतो. मास्कला मिळालेला थंडावा तुमच्या त्वचेला शांत आणि स्वच्छ करण्यास मदत करतो, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने झाल्याचा अनुभव मिळू शकतो.
चेहरा स्वच्छ आणि ताजातवाना करा (Cleanse & Exfoliate Face)
तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवरील मळ, तेल किंवा मेकअप काढून टाकण्यासाठी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी म्हणजेच त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी हा स्क्रब वापरला जातो, ज्यामुळे मास्कच्या सीरमचे चांगले शोषण होऊ शकेल.
शीट मास्क लावा (Apply Sheet Mask)
मास्क काळजीपूर्वक उघडून तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. तुमच्या नाक व तोंडाला चिकटवा. मास्क तुमच्या त्वचेला समान रीतीने चिकटलाय याची खात्री करून घ्या…
मान, हात व कोपरांवर अतिरिक्त सीरम वापरा (Use Extra Serum On Neck, Hands, Elbows)
पॅकेटमध्ये उरलेले कोणतेही सीरम वाया जाऊ देऊ नका. अतिरिक्त सीरम हायड्रेशन आणि पोषणासाठी तुमच्या मान, हात व कोपरांवर लावा. या भागांवर अनेकदा जास्त लक्ष द्यावे लागते आणि सीरम त्यांना मऊ आणि उजळ करण्यास मदत करू शकते.
योग्य घटक निवडा (Choose Right Ingredients )
तुमच्या त्वचेच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारे घटक असलेला शीट मास्क निवडा. हायड्रेशन, ब्राइटनिंग, अँटी-एजिंग यासाठी तुम्हाला योग्य असा मास्क बाजारात उपलब्ध मिळेल. हायलुरोनिक अॅसिड, व्हिटॅमिन सी किंवा ग्रीन टी यांसारखे घटक असणारा शीट मास्क निवडा; जो विविध फायदे देऊ शकतो.
शीट मास्क लावण्याचे फायदे (Benefits Of Applying sheet mask)
शीट मास्क त्वचेला हायड्रेट, पोषण व उजळ करण्याचा एक जलद व सोपा मार्ग आहे. कोरडेपणा, निस्तेजपणा, वृद्धत्वाची चिन्हे यांसारख्या त्वचेच्या विविध समस्या नष्ट करण्यात हा मास्क मदत करू शकतो. शीट मास्कमधील घटक त्वचेत खोलवर जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या स्किनकेअर रूटीनला चांगला फायदा होईल.