Hyundai ने भारतीय बाजारात Grand i10 Nios नवीन पावरफुल व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. नव्या Grand i10 Nios मध्ये BS6 कम्प्लायंट 1.0-लिटर टर्बो GDi इंजिन आहे. टर्बो इंजिन असलेली ही नवी कार Sportz आणि Sportz Dual Tone अशा दोन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे. नव्या i10 मध्ये दिलेले टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 998 cc चे आहे. 5-स्पीड मॅन्युअल स्टँडर्ड गिअरबॉक्स असलेले हे इंजिन 6,000 rpm वर 99 bhp ची ऊर्जा आणि 1,500 ते 4000 rpm दरम्यान 172 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनमुळे ही आतापर्यंतची सर्वात पावरफुल i10 कार ठरते, असं कंपनीने म्हटलंय.

(आणखी वाचा – स्टॉक संपवण्याचा सेल, Hyundai च्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट)

(आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच, Fortuner ला टक्कर)

नवीन कलर :-
कारच्या लुकमध्ये अधिक बदल करण्यात आलेला नाही, पण फ्रंट ग्रिलवर ‘Turbo’ बॅजिंग देण्यात आली आहे. यामुळे पावरफुल व्हर्जनला वेगळी ओळख मिळालीये. कंपनीने ही कार ड्युअल-टोन कलर्समध्ये आणली असून यामध्ये ब्लॅक रूफसोबत फेअरी रेड आणि ब्लॅक रूफसोबत पोलार व्हाइट कलर्सचा समावेश आहे. याशिवाय सिंगल टोन कलर्स- अॅक्वा टील आणि पोलार व्हाइटमध्येही उपलब्ध असेल.

(आणखी वाचा – आली ‘मारुती’ची बहुप्रतिक्षित SUV, फक्त 11 हजारांत बुकिंगला सुरुवात)

आणखी वाचा – किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)

फीचर्स :-
नेहमीच्या Sportz व्हेरिअंटच्या तुलनेत टर्बो व्हर्जनमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, 15-इंच डायमंड कट अॅलॉय व्हिल्स, कलर इन्सर्ट्ससोबत ब्लॅक इंटीरिअर, लेदर फिनिश स्टीअरिंग व्हिल, वायरलेस चार्जर आणि फ्रंट युएसबी चार्जर यांसारखे फीचर्स मिळतील. याशिवाय अन्य फीचर्स नेहमीच्या Sportz व्हेरिअंटप्रमाणेच आहेत.

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

(आणखी वाचा – तेव्हा गाढव बांधून काढली होती धिंड, आता SUV ने 8 महिन्यांमध्येच केला धमाका)

किंमत :-
टर्बो इंजिनची Hyundai Grand i10 Nios दोन व्हेरिअंट Sportz आणि Sportz Dual Tone मध्ये लाँच करण्यात आली असून अनुक्रमे किंमत  7.68 लाख आणि 7.73 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

 

 

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.