असं म्हणतात की राग हा सुखाचा शत्रू असतो. असे अनेक प्रसंग असतील जेव्हा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवले असते तर कदाचित परिस्थिती काही वेगळी असती. जर तुम्हाला सुद्धा लहान लहान गोष्टींवरून राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल तर तुम्हालाही आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे शिकून घ्यायला हवे. रागामुळे आपल्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. राग मर्यादेपलीकडे वाढू लागला आहे असे मानणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही टिप्स (Tips To Control Anger)

वेळ घ्या

जेव्हा तुम्हाला खूप राग येईल तेव्हा स्वतःसाठी वेळ काढा आणि शांत बसा. यामुळे तुमचा राग थोडा कमी होईल आणि तुम्ही, पुढे काय करावे, परिस्थिती कशी हाताळावी याबाबत शांत डोक्याने अधिक चांगला विचार करू शकाल.

गोष्टी मनामध्ये ठेवू नयेत

जेव्हा एखादी व्यक्ती गोष्टी मनातच ठेवू लागते तेव्हा तिचा राग चुकीच्या ठिकाणी बाहेर पडू शकतो किंवा एकाचा राग दुसऱ्यावर निघू शकतो. तुमच्या मनातील गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगून टाकल्यावर तुमच्या मनात गोष्टी राहणार नाहीत आणि तुमचा राग इतर कोणावरही निघणार नाही.

तुम्ही कधी उलट चालण्याचा प्रयत्न केला आहे का? आहेत अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे

तणाव कमी करा

जेव्हा एखादी व्यक्ती खूप तणावाखाली जगू लागते तेव्हा तिला रागही सहज येऊ लागतो. याच कारणामुळे अगदी क्षुल्लक गोष्टींवरूनही चिडचिड होऊ लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोलण्यापूर्वी विचार करा

ही गोष्ट आपल्या सतत कानावर पडत असते परंतु असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला खूप राग आला असेल आणि तुम्हाला कोणाला काही सांगायचे असेल तर त्याआधी काही काळ नीट विचार करा की ते खरेच सांगण्याची गरज आहे का किंवा त्यानंतर त्याचा परिणाम काय होईल इत्यादी.

मनामध्ये अंक मोजा

जर तुम्हाला खूप राग आला तर हळूहळू १ ते १०० पर्यंत अंक मोजा. यामुळे तुम्हाला शांत व्हायला वेळ मिळतो.

गाणी ऐका

खूप राग आला असेल तेव्हा आपली आवडती गाणी ऐकल्याने आपलं डोकं शांत होण्यास मदत होते. तुमचे मन प्रसन्न होऊन हळूहळू राग शांत होतो.