गेल्या वर्षभरापासून करोना व्हायरस सोबतची लढाई सुरूच आहे. या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून सगळ्यांना घरी आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय. आता गेली दोन वर्ष आपण प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम करत असल्याने आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याचबरोबर आपल्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जसजसा काळ उलटत गेला तसतसे घर बसल्या काम कंटाळवाणेही वाटू लागले. तर अनेकांना घरबसल्या तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेले हे बदल धोकादायकही ठरू शकतात. त्यामुळे काम करत असताना शरीराची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. तासनतास लॅपटॉप आणि कम्प्युटर समोर बसल्याने थकवा तसेच डोक्याला ताण पडतो व अवघडल्या सारखे वाटते. म्हणून थोडावेळ जागेवरुन उठावे आणि काही वेळ विश्रांती घ्यावी.

२. काम करत असताना आपल्या शरीराची हालचाल करावी. कारण एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत बसून राहिल्याने शरीराला याचा त्रास होऊ शकतो. म्हणून काम करत असताना अधून मधून बसण्याची स्थिती बदलत रहा.

३. घरातून काम करताना आसनव्यवस्थेकडे दुर्लक्ष करू नका. पाठीच्या कण्याला आराम देणारी खुर्ची वापरा. पाठदुखीचा सामना करण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने उभे रहा. अधूनमधून स्ट्रेचिंग करा.

४. आपण सतत आपल्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर काम करत असतो. म्हणून आपल्या डोळ्यांना अंधुक दृष्टी, डोळ्यांची जळजळ इतर समस्या उद्भवू शकतात. लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन आपल्या डोळ्यापासून सुमारे एक फूट अंतरावर असावी. जेणेकरून डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही.

५. वर्क फ्रॉम होममुळे नैराश्य, तणाव, चिंता आणि दु: खाच्या भावना उद्भवू शकतात. जास्त तास काम केल्यामुळे थकवा देखील जाणवू शकतो.

६. कम्प्युटरवर काम करताना आपल्या हातांचे कोपरे बऱ्याच कालावधीसाठी एकाच स्थितीत राहतात. अशाने हाताचे स्नायू आखडून दुखण्याचा त्रास होतो. म्हणून थोडावेळ हातांना आराम द्यावा व हातांचा व्यायाम करावा.

७. न चुकता दररोज व्यायाम करा. आपण तणावमुक्त राहण्यासाठी एरोबिक्स, इमारतीच्या आवारात सायकल चालविणे, घरच्या घरी चालणे, योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन सारखे पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते. शिवाय, मानसिक आणि शारिरीक थकवा देखील दूर होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important health tips while working from home scsm
First published on: 08-07-2021 at 15:27 IST