भारतीय रेल्वे पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत असते. आयआरसीटीसी रोज पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज आणते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही पॅकेजेस प्रत्येक व्यक्तीच्या बजेटमध्ये असतात आणि या अंतर्गत त्यांना अनेक लक्झरी सुविधा देखील मिळतात. त्यामुळे तुम्हीही यावेळी माता वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC टूर पॅकेज खूप चांगला पर्याय आहे..

या टूर पॅकेजमध्ये भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे प्रवाशांंना वैष्णोदेवीसह आगरा मथुरा हरिद्वार आणि ऋषीकेश या ठिकाणांना भेट देता येईल. हे टूर पॅकेज ८ रात्री व ९ दिवसांचे असून याची सुरूवात १० जून पासून होणार आहे. या जबरदस्त टूर पॅकेजची सविस्तर माहिती येथे देणार आहोत.

रेल्वेचा मार्ग

१० जूनला सिंकदराबाद येथून रेल्वे थेट आगाराला पोहचणार आहे. येथे प्रवाशांना बसद्वारे आगरा, मथुरा आणि वृंदावनमध्ये विविध ठिकाणांचे दर्शन घेता येईल. त्यानंतर ही रेल्वे थेट कटरासाठी रवाना होईल. प्रवाशांना येथे माता वैष्णोदेवीची दर्शन करता येईल. परतीच्या प्रवासात प्रवाशांना हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी नेण्यात येील. येथे त्यांना विविध धार्मिक स्थळांना दर्शन करण्याची संधी मिळेल. ​

हेही वाचा- IRCTCने लेह आणि लडाख फिरण्यासाठी आणले जबरदस्त टूर पॅकेज, कमी खर्चात मित्रांसोबत काढा ट्रिप

या धार्मिक स्थळांचे घेता येईल करता

या टूर पॅकेजमध्ये प्रवासी प्रथम आग्राचा ताजमहाल, मथुरेतील कृष्णजन्मभूमी, वृंदावनचे बांके बिहारी मंदिर, प्रेम मंदिर, कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिर, हरिद्वारची मनसा देवी, हर की पौड़ी, ऋषिकेशचे लक्ष्मण झुला आणि रामा झूला यांचे दर्शन घेता येईल.

तुम्ही याप्रमाणे तिकीट बुक करू शकता

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये एकूण ७०० जागा आहेत. यात स्लीपरसाठी ४६० जागा, थर्ड एसी १९३ आणि सेकंड एसीसाठी ४८ जागा आहेत. प्रवासी तीन श्रेणींमध्ये तिकीट बुक करू शकतात. इकोनॉमी, स्टँडर्ड आणि कम्फर्ट. इकॉनॉमी क्लासचे भाडे १५,४३५ रुपये, स्टँडर्ड क्लासचे भाडे ३४,७३५ रुपये आणि कम्फर्ट क्लासचे भाडे ३२,४८० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा – कमी खर्चात नेपाळ फिरायचयं? मग, IRCTC चे हे पॅकेज निवडा, तुमची इच्छा पूर्ण करा

या सुविधाही उपलब्ध असतील

प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची काळजी करण्याची गरज नाही. प्रवाशांसाठी दुपारचे जेवन, रात्रीचे जेवण आणि नाश्ताची व्यवस्था IRCTC कडून केली जाईल. याशिवाय प्रवाशांचा प्रवास विमा आणि हॉटेलचे भाडेही या भाड्यात समाविष्ट आहे.

पाहण्यासाठी प्रवासी विंडो उघडली आहे. यात्री कोणत्याही माहितीसाठी ८२८७९३२२२८, ८३८७९३२२२९ वर देखील संपर्क करू शकता.