scorecardresearch

जळलेल्या कपड्यांमुळे इस्त्री खराब झाली आहे का? दोन मिनिटांत करा साफ, जाणून घ्या सोपा उपाय

Iron cleaning: जेव्हा कधी इस्त्री दुसऱ्यांदा वापरतो तेव्हा इस्त्रीचा जळलेला भाग कपड्यांवर लागतो ज्यामुळे कपडे आणखी खराब होतात.

Iron cleaning:
जळलेल्या कपड्यांमुळे इस्त्री खराब झालीये? दोन मिनिटांत करा साफ ( Photo – Freepik)

Clean Burn Iron: कधी कधी इस्त्री करताना अचानक कपडे चिकटतात ज्यामुळे कपड्यांचे नुकसान तर होतेच पण त्याच बरोबर इस्त्री देखील खूप खराब होते. जोपर्यंत इस्त्री व्यवस्थित साफ करत नाही तोपर्यंत ती दुसऱ्यां कपड्यांवर वापरू शकत नाही. अशातच जर एखादा कपडा इस्त्रीला चिकटला तर तो साफ करण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो, पण तरीही इस्त्री साफ होत नाही. जेव्हा कधी इस्त्री दुसऱ्यांदा वापरतो तेव्हा जळलेला भाग कपड्यांवर लागतो ज्यामुळे कपडे आणखी खराब होतात. जर एकदा कपडा इस्त्रीला चिकटला तर हा आपल्यासाठी मोठी समस्या होऊन जाते. जर तुम्ही अनेक उपाय करुनही जळलेली इस्त्री साफ होत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत जो वापरुन तुम्ही या समस्येतून २ मिनिटांमध्ये सुटू शकता.

या कारणामुळे जळते इस्त्री

जर इस्त्रीचे तापमान जास्त असेल आणि आपण व्यवस्थित लक्ष दिले नाही तर बहुतेकदा कपडे तर जळतात किंवा कधी कधी आपण अशा कपड्यांनी इस्त्री करतो ज्यांनी त्याची गरज नसते आणि इस्त्री लागताच ते कपडा जळतो. आपल्या या चूकांमुळे इस्त्री देखील खराब होते.

हेही वाचा – धुतल्यानंतरही तुमचे केस तेलकट दिसतात का? जाणून घ्या कारण आणि उपाय

पॅरासिटामॉल टॅब्लेट वापरा

जर इस्त्रीवर चिकटलेली घाण निघत नसेल तर प्रथम इस्त्री थोडी गरम करा. गरम होताच इस्त्री बंद करा. नंतर त्यावर पॅरासिटामॉलची गोळी चोळा. पॅरासिटामोल टॅब्लेट काठावर धरून ठेवा आणि काळजीपूर्वक घासून घ्या जेणेकरून तुमचे बोट इस्त्रीला स्पर्श करणार नाही. जेव्हा तुम्ही गोळी घासता तेव्हा इस्त्रीला चिकडलेले कापड हळूहळू वितळू लागते. जेव्हा ते वितळण्यास सुरवात होते तेव्हा दुसऱ्या कापडाने त्याची घाण काढून टाका. सर्व घाण काही वेळात बाहेर पडेल.

बेकिंग सोडा देखील वापरता येतो

जर तुम्हाला जळलेली इस्त्री साफ करायची असेल तर तुम्ही त्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरू शकता. एक वाटी बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट इस्त्रीच्या जळलेल्या भागावर लावा आणि नंतर कापडाने घासून घ्या. काही वेळाने तुम्हाला दिसेल की, इस्त्रीवर चिकटलेली घाण हळूहळू बाहेर पडू लागेल. जर इस्त्रीमध्ये वाफेसाठी लहान छिद्रे केली गेली असतील तर लक्षात ठेवा की, बेकिंग सोडा त्यात प्रवेश करू नये.

हेही वाचा : उपवास सोडताना पपई खाणे आरोग्यासाठी का आहे सर्वोत्तम पर्याय?

व्हिनेगर देखील घाण दूर करेल

एक छोटा टॉवेल घ्या आणि व्हिनेगरने ओला करा. मग तो टॉवेल इस्त्रीवर ठेवा. अर्ध्या तासानंतर हलक्या हातांनी प्रेस चोळा, जळालेला भाग हळूहळू स्वच्छ होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 11:48 IST

संबंधित बातम्या