जम्मू आणि काश्मीर पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (JPDCL) ने शनिवारी घरबसल्या वीजबिल भरण्याची मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

‘वीजबिल भरणे सोपे झाले आहे. घरबसल्या पैसे भरा’ या मोहिमेअंतर्गत ग्राहकांना घरबसल्या वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिली आहे.

यापुढे बोलताना प्रवक्त्याने सांगितले की, यामुळे ग्राहकांचा वेळ तर वाचेलच, पण या महामारीच्या काळात त्यांना बिल भरण्यासाठी बँकेत रांगेत उभे राहावे लागणार नाही. ते म्हणाले की, मीटर रीडर्स जेपीडीसीएलच्या सर्व नोंदणीकृत ग्राहकांच्या घरी भेट देतील आणि कुटुंबातील किमान एका सदस्याच्या मोबाइलवर ‘बिल सुविधा अॅप’ टाकून देतील. या अॅपद्वारे ग्राहकांना त्यांचे बिल भरता येणार असून त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही.

ते म्हणाले की, जीपीआरएस इनेबल असलेलं पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन उपविभागांना (उपविभाग) सुपूर्द केले जाईल, जे नंतर संबंधित महसूल केंद्र चालवतील आणि मीटर रीडर्सना पीओएस मशीन सुपूर्द करतील. जेणेकरून ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून ​​झटपट बिल भरू शकतील.

आणखी वाचा : वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांना स्ट्रोकचा धोका वाढला, जाणून घ्या साधे-सोपे उपाय

उपविभागीय कार्यालयांनी डिसेंबर महिन्याची बिले दिल्यानंतर १० जानेवारीपासून ‘बिल सुविधा अॅप’ डाउनलोड करण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पीओएस मशीनद्वारे बिले भरण्याची प्रक्रिया २० जानेवारीपासून सुरू होईल. J&K बँकेशी अटी व शर्तींवर वाटाघाटी झाल्यानंतर आणि उपविभागीय कार्यालयात POS मशीन मिळाल्यानंतर ही सेवा सुरू होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा पद्धतीने सुद्धा बिल भरू शकता
जम्मूमधील वीज बिले “बिल सुविधा अॅप” (billsahuliyat.jkpdd.net) च्या वेबसाइटद्वारे देखील भरली जाऊ शकतात. लॉगिन न करताही तुम्हाला या साइटवर बिल भरण्याचा पर्याय मिळेल. “क्विक पे” अंतर्गत, तुम्हाला ग्राहक कोड प्रविष्ट करावा लागेल आणि त्याची पुष्टी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला भरायच्या रकमेचा तपशील टाकावा लागेल. बिलावर नमूद केलेले नाव आणि मोबाईल क्रमांकही नमूद करावा. त्यानंतर प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी “पे नाऊ” वर क्लिक करा.