Drink Water For Kidney :मुत्रपिंड(किडनी)च्या आरोग्यासाठी, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आणि ‘किडनी स्टोन’ सारख्या समस्या टाळण्यासाठी पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञ प्रौढ व्यक्तीला रोज १.५ लिटर ते २ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात पण प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य आणि गरजानुसार पाणी पिण्याच्या प्रमाणात फरक असू शकतो. फिकट पिवळी लघवी आणि सातत्याने लघवीला जाणे हे शरीरात पुरेशी पाण्याची पातळी आहे याचे लक्षण आहे. जरी बहुतांश द्रवपदार्थ शरीरासाठी उपयुक्त असले तरी, साखरयुक्त पेये आणि मद्य यांचे प्रमाण मर्यादित ठेवले पाहिजे.

प्राचीन काळापासून पाणी हे जीवनाचे अमृत आहे असे मानले जाते. पाणी पिणे हे शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक आहेच त्याचबरोबर तापमान नियंत्रित ठेवते, पोषणद्रव्यं आणि टाकाऊ पदार्थांचे वहन करते, अन्न पचवण्यासाठी मदत करते, सांध्यांना स्नेहन (lubricates joints) पुरवते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेला आधार देते. पाणी हे अशा अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये ते मोलाची भूमिका बजावते.

दुसरीकडे, आपल्या मूत्रपिंडांना आपण फारसं लक्ष देत नाही, पण ते आपल्या शरीरातील ‘गुप्त नायक’ असतात — २४ तास काम करून ते टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकतात आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात.

मूत्रपिंडाचे आरोग्य सुरळीतपणे चालू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर त्याकडे दुर्लक्ष केल्यास शरीरात टाकाऊ घटकांचे प्रमाण वाढते जे शरीरात अनेक आरोग्य समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकते जसे की, रक्तदाब वाढणे, अॅनिमिया, किंवा हाडांसबधीत समस्या…

पाणी हे मुत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडते. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या पाणी पिण्याच्या सवयीच मूत्रपिंडांना उत्तम कार्यक्षमतेत ठेवण्याची गुरुकिल्ली ठरू शकताक? होय, अगदी बरोबर आहे.

मूत्रपिंडाचे आरोग्य आणि पाणी पिण्याची खरी गरज (Kidney health and the real need to drink water)

“दिवसातून आठ ग्लास पाणी प्या” हा सल्ला सर्वश्रुत असला, तरी मूत्रपिंड तज्ज्ञांच्या मते, शरीराची पाण्याची गरज ही वय, शारीरिक हालचाल, हवामान आणि आरोग्य स्थिती यावर अवलंबून असते.

जगभरात दर सात प्रौढांपैकी एकाला दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (CKD) असतो आणि डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) हे या आजाराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे. त्यामुळे, मूत्रपिंड निरोगी राहावे यासाठी दररोज किती पाणी पिणं आवश्यक आहे, हे समजून घेणं धिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा – पुरेसे पाणी प्या, शरीराची पाण्याची पातळी राखा.

मुत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पाणी इतकं का आहे महत्त्वाचे (Why is water so important for kidney health?)

मूत्रपिंडं दररोज सुमारे ५० गॅलन रक्त फिल्टर करतात, ज्यातून टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव मूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात. पुरेसे पाणी प्याल्यास, हे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडतं कारण त्यामुळे युरिया, सोडियम आणि इतर विषारी द्रव्ये पातळ (dilute ) होतात आणि त्यांचा अपायकारक परिणाम कमी होतो. पण जर शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर हे द्रव्य घनता(सांद्रता) अधिक वाढते आणि त्यामुळे मूत्रपिंडातील खडे, यूरीन इन्फेक्शन (UTI) आणि दीर्घकालीन मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच, मूत्रपिंड निरोगी ठेवायचं असेल तर पाणी प्यायलाच हवं.

वैद्यकीय संशोधन काय सांगतं?(What does scientific research say?)

२०२१च्या एका अभ्यासानुसार, जे लोक जास्त पाणी पितात त्यांना ‘दीर्घकालीन मूत्रपिंड रोग (Chronic Kidney Disease)ची शक्यता कमी असते.

अधिक पाणी पिणं = मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत सुधारणा.

मात्र, तज्ज्ञ सांगतात की, अती पाणी पिणंही धोकादायक ठरू शकतं, विशेषतः ज्यांना आधीपासून किडनी वा हार्ट प्रॉब्लेम्स आहेत.

८-ग्लास पाणी पिण्याचा नियम: तथ्य की काल्पनिक?

दररोज आठ ग्लास पाणी (सुमारे २ लिटर) पिण्याचा दीर्घकाळचा सल्ला, जरी तो सामान्य मार्गदर्शक तत्त्व म्हणून सुरू झाला असला तरी – तो वैद्यकीयदृष्ट्या समर्थित नाही. खरं तर, अलीकडील निष्कर्षांवरून असे दिसून येते की,” प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक गरजा मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.

पाण्याच्या गरजांवर परिणाम करणारे प्रमुख घटक:

  • शरीराचे वजन आणि आकार
  • शारीरिक हालचाली
  • वातावरण/हवामान (उष्ण = जास्त पाणी कमी होणे)
  • आहार (उदा. जास्त मीठ किंवा प्रथिने = जास्त द्रवपदार्थ आवश्यक)
  • वैद्यकीय परिस्थिती (उदा. मूत्रपिंडाचा आजार, मधुमेह, हृदयरोग)
  • औषधे (लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध द्रव कमी होणे वाढवते)

मग किती पाणी पिणं योग्य आहे?(So how much water is appropriate to drink?)

Mayo Clinic नुसार:

पुरुषांसाठी: सुमारे ३.७ लिटर/दिवस (१५.५ कप)

महिलांसाठी: सुमारे २.७ लिटर/दिवस (११.५ कप)

हे केवळ पाण्यातून नव्हे, तर चहा, फळं, भाज्या, सूप यांमधून मिळणाऱ्या द्रवातून मिळून असावं.

मुत्रपिंडाच्या निरोगी कार्यासाठी नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) म्हणजे मूत्रपिंडाचे (kidney) विकार आणि त्यांच्या उपचारांमध्ये तज्ज्ञ सहासा सांगतात की,

सामान्य आरोग्यदायी व्यक्तींसाठी:

१.५ ते २ लिटर शुद्ध पाणी (६–८ कप) दररोज आवश्यक

जर तुमची शारीरक हालचाल अधिक असे किंवा तुम्ही उष्ण वातावरणात राहात असाल तर अधिक पाणी पिण्याची आवश्यकता आहे.
जर तुम्हाला एंड-स्टेज रेनल डिसीज (ESRD) सारखे काही किडनीचे आजार असतील तर कमी प्रमाणात पाणी प्यावे.

मुत्राशयात खडे असलेल्यांनी जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. साधारण २,५ लिटर मूत्र निर्माण होईल एवढे पाणी प्यावे म्हणजे जवळपास ३ लिटर द्रवपदार्थ प्यावे.

तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी पित आहात कसे ओळखावे? (Are you drinking enough?)

तुम्ही पुरेसे पुरेशा प्रमाणात पाणी पित आहात की नाही हे तुम्हाला कसे कळेल? तज्ज्ञांचा सल्ला आहे की, प्रत्येक औंस मोजण्याऐवजी, तुमच्या शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या. मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी तुम्ही पुरेसे हायड्रेटेड आहात की नाही हे कसे ओळखावे ते येथे आहे:

  • फिकट पिवळा लघवी हा एक चांगला संकेत आहे.
  • गडद पिवळा किंवा पिवळा रंग म्हणजे तुम्हाला जास्त पाण्याची आवश्यकता आहे.
  • तुम्ही दिवसातून ६-८ वेळा लघवी करता.
  • तुम्हाला क्वचितच तहान लागते किंवा तोंड कोरडे पडते.
  • तुम्हाला आळस किंवा चक्कर येत नाही, ही डिहायड्रेशनची सामान्य लक्षणे आहेत.

अति पाणी पिण्याचे धोके (Overhydration):

अति पाणी प्यायल्यास हायपोनाट्रेमिया (Hyponatremia) होऊ शकतो ही शरीरातील सोडियमची पातळी धोकादायकरीत्या कमी होण्याची स्थिती आहे.

हे विशेषतः मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त, हृदयविकारग्रस्त किंवा लिव्हर सिरीओसिस असणाऱ्या रुग्णांमध्ये दिसून येतं

सगळे द्रवपदार्थ उपयोगी असतात का? Does all fluid count?

हो आणि नाही दोन्ही!

  • पाणी, हर्बल टी, लो-शुगर ज्यूस, सूप, फळं हे सगळं उपयुक्त
  • कॉफी/टी हे माफक प्रमाणात हायड्रेशनसाठी चालतात
  • शुगरयुक्त कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, दारू हे टाळा – मूत्रपिंडावर ताण आणतात, मुत्राशयात खडाचा धोका वाढवतात.

शरीरातील पाण्याची पातळी राखताना सतर्क राहा

बहुतेक लोकांना वाढत्या पाण्याच्या पातळीचा फायदा होत असला तरी, काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये नियंत्रित पाण्याचा वापर आवश्यक असतो:

  • मूत्रपिंड निकामी होणे किंवा उशिरा टप्प्यातील CKD
  • हृदयविकार
  • यकृत सिरोसिस
  • कमी सोडियम पातळी (हायपोनेट्रेमिया)

अशा प्रकरणांमध्ये, जास्त प्रमाणात द्रवपदार्थ सेवन केल्याने द्रवपदार्थ टिकून राहणे (fluid retention), सूज येणे किंवा धोकादायकपणे सोडियम पातळी कमी होऊ शकते. तुमच्या सुरक्षित पाण्याच्या मर्यादा निश्चित करण्यासाठी नेहमी डॉक्टर किंवा नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

मूत्रपिंडाच्या समस्या, हृदयरोग किंवा हार्मोनल असंतुलन असलेल्या व्यक्तींसाठी हे विशेषतः महत्वाचे आहे. मळमळ, गोंधळ किंवा पोटफुगी ही पाण्याचे जास्त पातळी झाल्याचे लक्षणे असू शकतात. तुमच्या पाण्याच्या सेवनाचे निरीक्षण करणे आणि अशा चेतावणी चिन्हांकडे लक्ष ठेवणे हे मोठी गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकते.

थोडक्यात, प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे
मूत्रपिंड दिवसाचे २४ तास, तुमच्यासाठी काम करत असतात. त्यांना थोडं मदत करा, दररोज पुरेसे पाणी प्या, आणि तुमचं आरोग्य सुदृढ ठेवा.