Kitchen Jugaad : स्वयंपाक घरात मिक्सरचा वापर नियमितपणे होत असतो. अगदी वाटण तयार करण्यापासून इडलीचं पीठ काढण्यापर्यंत ते चण्याची डाळ दळण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी मिक्सरचा वापर केला जातो. पण सतत वापरुन मिक्सरचं भांड खूप खराब होते. अशावेळी मिक्सरचं भांडं साफ करणं म्हणजे खूप कठीण काम असतं. विशेषत: ब्लेडजवळ साचलेली घाण, काळपटपणा किंवा वंगण साफ होता होत नाही. पण, मिक्सर स्वच्छ करताना ब्लेडमुळे हाताला दुखापत होते. अशावेळी मिक्सरचं भांडं स्वच्छ करायचे तरी कसे असा प्रश्न पडतो. यासाठी आम्ही तुम्हाला मिक्सरचं काळकुट्ट झालेलं भांडं स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने मिक्सरचं भांडं अगदी नव्यासारखं चमकवू शकता. चला जाणून घेऊ या सोप्या टिप्स.
मिक्सरचं भांडं स्वच्छ करण्यासाठी टिप्स (Mixer Grinder Cleaning Tips)
हेही वाचा – कोटिंग खराब होताच नॉन स्टीक पॅन फेकून देताय? मग जरा थांबा, त्याचा ‘असा’ करा पुन्हा वापर
लिक्विड डिशवॉश, बर्फ अन् पाण्याने करा स्वच्छ
भांडं स्वच्छ करण्यासाठी त्यात बर्फाचे काही खडे टाका आणि मिक्सरने फिरवा. यानंतर त्यात लिक्विड डिशवॉशर घाला आणि ते चार ते पाच मिनिटे चांगले मिसळा. बर्फ आणि साबण एकत्र मिक्सरच्या भांड्यात मिसळल्यास सर्व घाण आणि वंग आणि काळपटपणा निघून जाईल. यानंतर भांड्यात लिक्विड डिशवॉश टाकल्यानंतर तयार झालेले अस्वच्छ पाणी फेकून द्या. नंतर भांडं चांगल्या पाण्याने धुवा, यानंतर पुन्हा एकदा भांड्यात थोडे पाणी घेऊन ते मिक्सरने फिरवा. अशाप्रकारे मिक्सरच्या भांड्यातील ब्लेड अन् आसपासच्या भागात अडकलेली घाण साफ होईल.
Read More Lifestyle News : रेशनिंगच्या तांदळात तुम्हालाही आढळतायत प्लास्टिकसारखे दिसणारे तांदूळ? मग हा Video पाहाच
बेकिंग सोड्याचा करा वापर
मिक्सरच्या भांड्यामधील घाण, काळपटपणा नीट स्वच्छ होत नसेल तर तुम्ही थोडे पाणी, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरू शकता. यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घ्या, त्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका आणि मिक्सर फिरवून घ्या; अशाने सर्व घाण एकाचवेळी साफ होईल.