Toilet cleaning ideas: आपल्या प्रत्येकाच्या घरात माचिस असतं. माचिसचा वापर आपण कशासाठी करतो तर आग पेटवण्यासाठी. म्हणजे गॅस, दिवा वगैर लावण्यासाठी आपण माचिस वापरतो. पण माचिसचा अनोखा असा वापर ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. हे माचिस तुम्ही कधी टॉयलेटमध्ये वापरून पाहिलं आहे का? टॉयलेटमध्ये माचिस वापरण्याचा मोठा फायदा. टॉयलेटमध्ये माचिस वापण्याचा असा परिणाम की तुम्ही विचारही केला नसेल. एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. ज्यात माचिस तुमचं टॉयलेटमधील असं काम करेल, जे करताना तुम्हाला घाण वाटते.
घरात साफसफाई काढली कि गृहिणींच्या नाकी नऊ येतात, छोट्या मोठ्या जागेवरची साफसफाई होऊन जाते पण घरात काही अश्या ठिकाणी साफसफाई कारण म्हणजे मुश्किल होऊन बसतं, जस कि बाथरूम . बाथरूम हा घरातील सगळ्यात अस्वच्छ भाग असतो. साफ सफाईकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अस्वच्छ होते. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. छोट्या छोट्या वस्तू कधी कधी खूप मोठ्या कामाच्या असतात. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आता तुम्ही म्हणाल नक्की करायचं तरी काय? तुम्हाला करायचं काय आहे तर, एका वाटीत एक चमचाभर मीठ, त्याच प्रमाणात खायचा सोडा घ्यायचा आहे. यात अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या. लिंबू रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर असेल तर तेसुद्धा टाकू शकता. आता यात पाणी टाकून मिक्स करा. यात सोडा असल्याने फेस येईल. मिश्रण डबल होईल.आता 7-8 माचिसच्या काड्या घ्या, जितकं पाणी जास्त तितक्या काडेपेटीच्या काड्या जास्त लागतील. काडेपेटीवर जो काळा भाग असतो तो काढून घ्या. तो चाकून खरवडून काढा किंवा त्यावर हलक्या हाताने ठेचलं तरी तो निघेल. ही पूड तुम्ही आधी तयार केलेल्या मिश्रणात टाकायची आहे. यात एक विशिष्ट केमिकल असतं ज्याचा परिणाम आपल्याला इथं दिसेल. दुसऱ्या कोणत्या केमिकलची गरज पडणार नाही. आता यात शॅम्पू टाका. त्याऐवजी तुम्ही साबणाचे तुकडे उरले असतील ते तेसुद्धा किसून टाकू शकता. हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या नंतर भरपूर बनवून तुम्ही हे एका पाकिटातही ठेवू शकता. आता या मिश्रणाचा टॉयलेटमध्ये काय फायदा. तर टॉयलेट कितीही स्वच्छ केले तरी त्यातील काही डाग जात नाही किंवा त्याची दुर्गंधी जात नाही. अशा ठिकाणी याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
पाहा व्हिडीओ
हा हटके जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. @Puneri tadka युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी करून पाहू शकता. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.