थंडीत बाजारात लालचुटूक गाजर दिसतात. थंडीच्या दिवसांत बाजारात येणारी गाजरं चवीला अतिशय छान असतात. त्यात गाजर हलवा…ही स्वीट डिश मधील सगळ्यांचीच आवडती डिश आहे. असं क्वचितच कुणी असेल ज्यांना गाजर हलवा आवडत नसेल. गाजर हलवा बनून तयार झाल्यानंतर खायला तर सगळ्यांनाच आवडतो. असे असले तरीही तो बनवताना गाजर किसावे लागते, तेव्हा मात्र हे फार कंटाळवाणे, किचकट काम वाटते. गाजर हलवा बनवताना गाजर किसताना हात दुखून येतो.
पण आता काळजी करु नका आज आम्ही तुमच्यासाठी एक खास ट्रिक घेऊन आलो आहोत. यामध्ये तुमचे १० किलो गाजरही फक्त १० मिनिटांत सोलून होतील..या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.आतापर्यंत तुम्ही खिसनीनं गाजर खिसले असतील पण कधी ग्लासने गाजर खिसले आहेत का किंवा पाहिलं आहे का? नाही ना…एका गृहिणीने हा जबरदस्त जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे असे कित्येक घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड.
१० किलो गाजर फक्त १० मिनिटांत
नेहमी आपण गाजर हलवा करायचा म्हंटलं की खिसनी किंवा सुरीनं खिसतो. पण यामध्ये गाजराचा बराचसा भाग निघतो. पण या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही गाजर सोलले तर गाजराच्या सालीसोबत गाजराचा भाग न निघता ते पटापट सोलून होतील. तुम्हाला विश्वास बसणार नाही ग्लास वापरून तुम्ही १० किलो गाजर फक्त १० मिनिटांत सोलू शकता, असा दावा या गृहीणीनं केला आहे. तुम्हीही पाहा हा जुगाड
पाहा व्हिडीओ
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)