Nutritious Foods: अलीकडच्या काळात लोकांना सर्व गोष्टी पटापट व्हायला हव्यात, असे वाटते. पण अनेकदा या गोष्टी लवकर करण्याच्या नादात ते त्यांच्या आहार आणि एकंदरीत आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. आपण अनेकदा विसरतो की, आपण जे पैसे कमावतो, त्यासाठी आपले आरोग्य व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. सगळेच जण दुपारचे आणि रात्रीचे जेवण न विसरता करतात; पण काही जण सकाळचा नाश्ता करायला मात्र विसरून जातात. प्रत्यक्षात मात्र सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण- त्यामुळे आपल्या शरीरात दिवसभर ‘एनर्जी’ राहते. त्याशिवाय काम करताना थकवा जाणवत नाही. सकाळचा नाश्ता न केल्यास भविष्यात आरोग्यावर त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

सकाळी वेळेवर नाश्ता केल्याने तुमचे वजन, कोलेस्ट्रॉल व उच्च रक्तदाब या सर्व गोष्टी नियंत्रणात राहतात. परंतु,असे खूप जण आहेत जे सकाळी नाश्ता करतात; पण त्यामध्ये कोणत्याही पौष्टिक पदार्थांचे सेवन करीत नाहीत. पण, सकाळच्या नाश्त्यामध्ये केवळ पौष्टिक आणि शरीराला एनर्जी देणाऱ्याच पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. मग अशा वेळी सकाळी नाश्त्यामध्ये नक्की काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

सकाळी नाश्त्यात खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ

ओट्स

ओट्समध्ये अनेक पोषक घटक असतात आणि तो एक पौष्टिक नाश्ता मानला जातो. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी, लोह, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर हे घटक आढळतात. तसेच त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. ओट्स तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा त्याचा पराठा, उपमादेखील बनवू शकता.

उकडलेली अंडी

उकडलेली अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. अंडी प्रोटीनचा खूप चांगला स्रोत मानली जातात. त्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही ती खाऊ शकता.

दूध आणि ब्राउन ब्रेड

दुधामध्येदेखील अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे याचे आवर्जून सेवन करावे. तसेच, यासोबतच ब्राऊन ब्रेडचेही सेवन करावे. कारण- त्यामध्ये जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, झिंक, फायबर यांसारखी अनेक खनिजे असतात.

हेही वाचा: Mango : आंबा खरेदी करताना ही ट्रिक वापरा, एकही आंबा खराब निघणार नाही

उपमा / पोहे / इडली

उपमा, पोहे, इडली हा नाश्ता प्रत्येकाच्या घरात बनविला जातो. हादेखील एक परिपूर्ण नाश्ता आहे. त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला पोषक घटकही मिळतात आणि एनर्जीदेखील मिळते.

उकडलेली कडधान्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उकडलेल्या कडधान्यांचा नाश्तादेखील आरोग्यासाठी खूप उत्तम मानला जातो. या कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच प्रथिने आणि जीवनसत्त्वांसारखे पोषक घटकही आढळतात.