लग्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीची अशीच इच्छा असते की त्याचे वैवाहिक आयुष्य त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या सोबतीने अत्यंत आनंदी असावे. परंतु अनेकदा असे होते की लग्नाला बरीच वर्ष झालेली असताना देखील पतिपत्नी विभक्त होण्याचा निर्णय घेतात. नुकतंच रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि साऊथचा सुपरस्टार धनुष यांनी तब्बल १८ वर्ष एकत्र राहिल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत.

ऐश्वर्या-धनुष, आमिर-किरण, सैफ अली खान-अमृता सिंग यांच्यासारखीच अनेक जोडपी आहेत जी लग्नच्या अनेक वर्षांनंतर विभक्त होतात आणि घटस्फोट घेतात. गेली १६ वर्षे विवाह समुपदेशन करणाऱ्या डॉ. जितांजली शर्मा यांनी सांगितलं की आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढीस लागले आहे. आजवर अभ्यास केलेल्या केसेसच्या आधारावर त्यांनी पती-पत्नीमधील विभक्त होण्याची काही कारणे सांगितली आहेत.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

विवाहबाह्य संबंध

डॉ. गीतांजली यांच्या मते, आजच्या काळात विवाहबाह्य संबंध हे पतीपत्नी विभक्त होण्यामागचं मोठं कारण आहे. सुरुवातीला दोघेही आपलं घर-संसार आणि करिअरमध्ये व्यस्त असतात. परंतु कालांतराने आपल्या जोडीदारापेक्षा आपला कल कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीकडे आहे किंवा आपण कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसोबत भावनिकरित्या जोडलेले आहोत असे त्यांना समजू लागते. असे असणे देखील पती-पत्नीच्या नात्यामध्ये फूट पाडू शकते.

Numerology : या तारखेला जन्मलेले लोक असतात अतिशय रोमँटिक आणि बुद्धिजीवी; जाणून घ्या तुमच्या जन्मतारखेचा यात समावेश आहे का

जोडीदाराकडे लक्ष न देणे

काही काळ लोटल्यानंतर नातेसंबंधांमध्ये काळजी आणि प्रेम कमी होऊ लागते. या कारणामुळे देखील पती-पत्नीची एकमेकांमधील आपुलकी कमी होऊ शकते.

जबरदस्ती केलेले लग्न

अनेकदा घरातल्या मंडळींच्या दबावाखाली, मनात नसताना देखील मुलं-मुलींना लग्न करावे लागते. घरच्यांचं मन राखण्यासाठी ते लग्नाला होकार देतात. परंतु कालांतराने त्यांच्या नात्यातील कटुता वाढू लागते. अशातच ते विभक्त होण्याचा निर्णय घेतात.

एकमेकांपेक्षा वेगळे असणे

सुरुवातीलाच जर दोघेही आपापले करिअर बनवण्यात व्यस्त असतील तर त्यांची प्रगती वेगवेगळ्या दिशेने होते. एकाच गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन भिन्न-भिन्न असू शकतो. उदाहरणार्थ, अनेकदा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या जोडप्यांचे आपापसात पटत नाही. त्यांना आपले करिअर दुसऱ्याच्या करिअरपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटते. जसजसा वेळ निघून जातो तसतसे त्यांना आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत याची जाणीव होऊ लागते.

मुलांमुळे बळजबरी नाते टिकवावे लागणे

लग्नांनंतर अनेक जोडप्यांमध्ये प्रॉब्लेम सुरु होतात. पण मुलं झाल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठी तडजोड म्हणून ते एकत्र राहतात. मुलं जाणती झाल्यानंतर निर्णय घेण्याचा विचार ही जोडपी करतात.

भारतीय मानसिकतेनुसार, जर जोडप्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मूल झाल्यानंतर सगळं ठीक होईल असा सल्ला त्यांना दिला जातो. अशातच मुलं झाल्यानंतरही ही जोडपी आपले नाते टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. कधी-कधी सर्वकाही ठीक होते. परंतु असे न झाल्यास कालांतराने ही जोडपी विभक्त होण्याचा निर्णय घेतात.