९ तारखेपासून गुगल अकाउंटवर लॉग इन करण्याचा मार्ग बदलणार, काय आहे जाणून घ्या!

टू स्टेप व्हेरिफिकेशन लागू केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन पायऱ्या (टू-स्टेप) पार कराव्या लागतील.

lifestyle
प्रथम तुम्हाला तुमचे Google खाते उघडावे लागेल. यानंतर नॅव्हिगेशन पॅनेलमधील सुरक्षा पर्याय निवडा.( photo: indian express)

तुम्ही यापुढे फक्त एका क्लिकवर Google खात्यात लॉग इन करू शकणार नाही. तुमच्या Google खात्यात लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला आता टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागेल. 9 नोव्हेंबरपासून सर्वांसाठी ही प्रक्रिया सक्तीची केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सुरक्षेचा विचार करून टू-स्टेप व्हेरिफिकेशन लागू करणे अत्यंत आवश्यक करण्यात आले आहे.

कंपनीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या एका ब्लॉकमध्ये ही माहिती शेअर केली होती. यात सांगितले होते की प्रत्येकाने त्यांच्या Google खात्यात लॉग इन करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे, सुमारे १५० दशलक्ष Google वापरकर्ते आपोआप या प्रक्रियेचा एक भाग बनतील. जर वापरकर्त्याने टू-स्टेप व्हेरिफिकेशन केले नाही, तर त्यांना Google खात्यात लॉग इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय गुगलने असेही म्हटले आहे की सुमारे २० लाख यूट्यूब निर्मात्यांना देखील हे फीचर स्वीकारावे लागेल.

टू-स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय?

टू स्टेप व्हेरिफिकेशन हा सुरक्षेचा एक स्तर आहे, खात्यात जोडल्यानंतर तुम्ही तुमचे खाते पूर्णपणे सुरक्षित करू शकता. टू स्टेप व्हेरिफिकेशन लागू केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन पायऱ्या (टू-स्टेप) पार कराव्या लागतील. पहिल्या चरणात तुम्ही तुमचा पासवर्ड टाका आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला OTP टाकावा लागेल. तुम्ही जर OTP नंबर टाकला नाही तर, तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ओटीपी मिळवण्यासाठी तुम्ही एसएमएस, व्हॉइस कॉल किंवा मोबाइल अॅप वापरू शकता.

टू स्टेप व्हेरिफिकेशन कसे चालू करावे?

टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करणे खूप सोपे आहे. येथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहोत की तुम्ही तुमच्या खात्यात टू स्टेप व्हेरिफिकेशन कसे चालू करू शकतात. प्रथम तुम्हाला तुमचे Google खाते उघडावे लागेल. यानंतर नॅव्हिगेशन पॅनेलमधील सुरक्षा पर्याय निवडा. सिक्युरिटीमध्ये, तुम्हाला Google मध्ये साइन इन करण्यासाठी जावे लागेल. यामध्ये तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2-स्टेप व्हेरिफिकेशन) वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर Get Started वर क्लिक केल्यानंतर तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करावे लागेल. संपूर्ण प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, तुमचे टू स्टेप व्हेरिफिकेशन केले जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Login to your google account will change from november 9 scsm

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या