मनावर दगड ठेवून आपण स्वतःला डाएट साठी तयार केलेलं असतं पण अचानक सोशल मीडियावर एखादा गुलाबजाम, चॉकलेट केकचा व्हिडीओ येतो आणि मग क्षणात आपल्यातील फूडी जागा होतो. पण कसंय डाएट असलं तरी तुम्ही बिनधास्त गोड खाऊ शकता.. हो बरोबर वाचलंयत! फक्त आपल्याला रेसिपी मधील काही पदार्थ बदलायचे आहेत, याने रेसिपीच्या चवीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही उलट चव आणखीन उत्तम होईल. आज आपण अशीच एक कुकीज कप ची रेसिपी पाहणार आहोत.

डाएट मध्ये अनेक प्लॅन्स मध्ये कॉफी थांबवायला सांगितले जाते, पण या पद्धतीने आपण कॉफीची मज्जा तर घेऊ शकतात पण सोबत कप सुद्धा खाऊ शकता. इंस्टाग्राम वरील Satvic Movement या पेजने काही दिवसांपूर्वी कुकीज कपची रेसिपी रील शेअर केली आहे. यामध्ये कॉफी व कुकीज कप ची हेल्थी रेसिपी दिलेली आहे.

साहित्य

  • गुळाची पावडर
  • Almond बटर
  • गव्हाचे पीठ/ किंचित मैदा
  • चिमूटभर मीठ
  • बेकिंग सोडा

कृती

  • सुरुवातीला तीन ते चार छोटे कप गुळाची पावडर घेऊन त्यात ३/४ टेबलस्पून बदाम बटर मिसळा. त्यात पाव वाटी गव्हाचे पीठ किंवा किंचित मैद्याचे पीठ घाला. हे मिश्रण नीट मळून घ्या त्यात चिमूटभर काळं मीठ व बेकिंग सोडा मिसळून मळून घ्या.
  • या पिठाचा गोळा बनवून आता छोट्या पेल्याच्या आकारात वळून घ्या. तत्पूर्वी पेल्याला बदाम बटरचा हलका थर द्या जेणेकरून बेकिंग नंतर हे कप चिकटणार नाहीत
  • आपल्याला हे कप ओव्हन मध्ये १५० डिग्रीवर १५ मिनिट बेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पेल्यातून हे कुकीज कप बाहेर काढा. यासासाठी हलक्या हाताने टॅप करा.

पहा कुकीज कप रेसिपी

तयार आहेत आपले कुकीज कप, आता यात आपण बदामाचे दूध टाकून किंवा गुळाची कॉफी घालून एक भन्नाट डिझर्टची मजा घेऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा खाण्यासाठीचे कप ही संकल्पना सोशल मीडियावर बरीच गाजली होती मात्र या कपला हेल्दी टच दिल्याने आरोग्याची काळजी घेणारी मंडळी सुद्धा बिनधास्त ही रेसिपी करू शकतात.