आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या दिवसांत मा दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्य गरबा, डांडिया सारखे कार्यक्रम होतात जे नवरात्री उत्सवात चैतन्य निर्माण करतात. गरबा करताना पारंपरिक वस्त्रांना लोक पसंती देतात. यावेळी महिला सुंदरतेबाबत विशेष काळजी घेतात. छान मेकअप करतात. चांगले मेकअप सुंदरता वाढवण्यात हातभार लावतात. त्वचा आणखी उजळून दिसते. तुम्हालाही डांडिया किंवा गरब्यामध्ये अधिक चांगले दिसायचे असल्यास तुम्ही पुढील मेकअप टीप्स फॉलो करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) केसांचा अंबाडा करा

तुम्ही गरबा किंवा डांडियासाठी जात असाल तर केसांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. केसांचा स्टाईलीश अंबाडा करा. मोकळे केस तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तुम्ही केसांची वेणी किंवा मेसी बन हेअर स्टाईल करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सुंदर फुलांचा अंबाडा देखील करू शकता. याने तुम्ही अधिक आकर्षक दिसाल.

(Navratri 2022 9 Colors: घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत यंदाचे नवरात्रीचे ९ रंग व ९ देवींचे मंत्र पाहून घ्या)

2) लाईट लिपस्टिकचा वापर करा

डार्क आयशॅडोबरोबर लाईट लिपस्टिक शेडचा वापर करा. डांडिया नाईटसाठी तुम्ही लाईट पीच, न्यूड शेड, हलका नारंगी रंगाच्या लिपस्टिकची शेड वापरू शकता. याने तुमचा चेहरा अधिक सुंदर दिसेल.

३) कपाळावर टिकली लावा

गरब्यासाठी जाताना कपाळावर टिकली असू द्या. हा पारंपरिक खेळ असून त्यात टिकली लावायचे विसरू नका. टिकली लावल्याने तुमच्या पारंपारिक परिधानाला संपन्नता येईल. तुम्ही काळी, लाल, आणि काचेने सजलेली टिकली वापरू शकता. टिकली तुमच्या सुंदरतेत अधिक भर घालेल.

(Shardiya Navratri 2022 Wishes: शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ मंगलमयी शुभेच्छा!)

४) डार्क आयशॅडो वापरा

डांडिया किंवा गरब्यासाठी जाताना तुम्ही घातलेल्या वस्त्राला साजेसा असा आयशॅडो द्या. तुम्ही डार्क आयशॅडोचा वापर करू शकता. याने तुम्ही अजून मोहक दिसाल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make up tip for garba and dandiya in navratri ssb
First published on: 26-09-2022 at 11:57 IST