‘फास्टफूड’च्या नावे कितीही ओरड होत असली तरी लोकांनी मात्र न्याहारीसाठी ‘मॅकडॉनल्ड’ या फास्टफूड निर्माती कंपनीला सर्वाधिक पसंती दिली आहे. रॉयटर्स संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसातून दोन वेळा न्याहारी करणाऱया सर्वाधिक ४१ टक्के लोकांनी दोन्ही वेळच्या न्याहारीसाठी ‘मॅकडॉनल्ड’च्या पदार्थांना पसंती दिली आहे. दिवसभरात कोणत्याही वेळी ‘मॅकडॉनल्ड’चे पदार्थ खाता येतात, असे या ४१ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, फास्टफूट सँडविचेससाठी लोकप्रिय असलेल्या ‘सब-वे’ला ३४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. बर्गर किंग २७ टक्के पसंतीसह तिसऱया स्थानी आहे. तर ‘स्टारबक्स’ला २६ टक्के लोकांनी पसंतीला कौल दिला. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध केएफसीचा पहिल्या दहामध्ये देखील स्थान मिळवता आलेले नाही. न्याहारीसाठी केएफसीला फक्त २२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcdonald no 1 choice for breakfastarians poll
First published on: 18-09-2015 at 17:09 IST