मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. यादरम्यान महिलांना स्तनावर सूज येणे, डोकेदुखी, पाठदुखी, पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय एनर्जीची कमतरता, मूड बदलणे आणि झोप न लागणे ही लक्षणेही त्रासदायक असतात. अशा परिस्थितीत, मासिक पाळी दरम्यान कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणे खूप कठीण होते. दरम्यान, एखादे कार्यक्रम किंवा सण येणार असेल, तर महिला मासिक पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी औषधे घेतात. मात्र, या औषधांमुळे विविध दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जर खूप महत्वाचे कारण असेल तर तुम्ही मासिक पाळी लांबवण्यासाठी काही घरगुती उपाय ट्राय करू शकता.

‘हे’ उपाय मासिक पाळीची तारीख वाढवण्यासाठी प्रभावी आहेत

मोहरीचे दाणे

मोहरीच्या बियांमध्ये तांबे, लोह, मॅग्नेशियम आणि सेलेनियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात. दोन चमचे मोहरी पावडर एक कप गरम दुधात मिसळून आठवड्यातून एकदा प्यायल्यास मासिक पाळी काही काळ लांबते.

Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात
Mugdha Vaishampayan congrats to Kartiki Gaikwad after pregnancy announcement
कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”
Women Health
Late periods : मासिक पाळी उशिरा येण्यामागे ‘ही’ ३ कारणे असू शकतात, जाणून घ्या
Early Menstruation tips
मासिक पाळी लवकर येण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; नक्कीच फायदा मिळेल

जिलेटिन

जिलेटिनचे पॅकेट एका भांड्यात पाण्यात विरघळवून लगेच प्या. हे मासिक पाळी टाळण्यास देखील मदत करू शकते. एवढेच नाही तर ते वारंवार प्यायल्याने तुम्ही हवे तितके दिवस मासिक पाळीपासून दूर राहू शकता. पाळी टाळण्याचा हा नैसर्गिक मार्ग असला तरी, हा उपाय दीर्घकाळ केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे महत्वाचे कारण असेल तरच हा उपाय करावा.

( हे ही वाचा: मासिक पाळी उशीरा येण्यास ‘ही’ असू शकतात कारणे; जाणून घ्या यावर फायदेशीर उपाय)

लिंबू

या प्रकारच्या फळामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. लिंबू मासिक पाळी पुढे ढकलण्यात आणि रक्त प्रवाह नियंत्रित करण्यास किंवा थांबविण्यात मदत करते. याशिवाय मासिक पाळीशी संबंधित समस्याही कमी होतात. यासाठी तुम्ही पाण्यात लिंबाचा रस पिऊ शकता.

तांदळाचे पाणी

जर तुम्हाला मासिक पाळी थोडी उशीर करायची असेल तर तुम्ही तांदळाचे पाणी लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. तुम्ही ते दिवसातून २ ते ३ वेळा पिऊ शकता. याने नक्की फरक जाणवेल.

( हे ही वाचा: Health Tips: पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला स्वच्छ ठेवा; संसर्गाचा धोका राहणार नाही)

व्हिनेगर

मासिक पाळी टाळण्यासाठी व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. यासाठी एका ग्लास पाण्यात तीन ते चार चमचे व्हिनेगर टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. याने मासिक पाळी पुढे लांबवण्यासाठी बराच फायदा होतो.