रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील मुख्य समस्या म्हणजे हाडांची होणारी झीज. यालाच वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असे म्हटले जाते. याशिवाय शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिची समस्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच पाळी थांबल्यावर महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आधुनिक जीवनशैली, मानसिक ताणतणाव, उशिरा लग्न होणे आणि नंतर वंध्यत्वाला सामोरे जाणे अशा अनेक कारणांनी रजोनिवृत्ती ही प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ लागली आहे.

काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीदरम्यान हाडे आणि हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये २०% हाडांचे नुकसान होते. ‘इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशन’तर्फे केलेल्या पाहणीतील आकडेवारीनुसार साठ वर्षांवरील दर तीनपैकी एका महिलेला ठिसूळ हाडांमुळे म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येमुळे एकदा तरी फ्रॅक्चरला सामारे जावे लागते.

शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात

रजोनिवृत्तीची सुरुवात झाल्यानंतर महिलांमध्ये ‘ऑस्टिओपोरोसिस’सह संधिवात, सांधेदुखीची जोखीम वाढते. रजोनिवृत्तीनंतरच्या टप्प्यात या विकारांमध्ये अनेक पटींनी वाढ होते. स्त्रीच्या अंडाशयात निर्माण होणारे संप्रेरक तिच्या हाडांचे आरोग्य निश्चित करतात. वयाच्या २५ ते ३० वर्षांपर्यंत महिलांच्या शरीरातील हाडांचे आरोग्य उत्तम असते. या काळात त्यांचे भरणपोषण नीट झाले नाही, तर त्यांच्या शरीरातील हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते. जेव्हा रजोनिवृत्तीचा टप्पा सुरू होतो, तेव्हा अशा महिलांना उतारवयात ‘ऑस्टिओपोरोसिस’सह इतर अस्थिविकारांना सामोरे जावे लागते. या अवस्थेत महिलांची हाडे कमकुवत होण्याचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. जगभरात साठ वर्षांवरील दहा स्त्रियांमागे एका स्त्रीला ‘ऑस्टिओपोरोसिस’चा त्रास होतो.

तरूणवयात आपली हाडं मजबूत असतात. पण वाढत्या वयाबरोबर हाडांची काही प्रमाणात झीज व्हायला लागते. ही झीज वयाच्या ३० वर्षांपासून सुरू होते. रजोनिवृत्तीच्या जवळ येत असताना, आपले शरीर कमी एस्ट्रोजन तयार करू लागते, यामुळे आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. म्हणूनच रजोनिवृत्ताच्या टप्प्प्यावर असताना वेळीच डॉक्टरांच्या सल्ला घेणं गरजेचं आहे.

रजोनिवृत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील ‘ऑस्टिओपोरोसिस’स्नायूही कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे रुग्णाच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. यावेळी नेहमीच्या हालचाली करतानाही रुग्णाला वेदना जाणवतात. ‘पेरी मोनापॉजल ऑस्टिओपोरोसिस’चे लवकर निदान व उपचार झाले, तर पुढील गुंतागुंत टळते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करता येतात. त्याचा खर्चही कमी येतो.

Health News : रात्री उशिरा जेवल्यामुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

रजोनिवृत्तीच्या काळात हाडांतील क्षार आणि जीवनसत्त्वेही कमी होऊ लागतात. त्यामुळे आपल्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे असते. आपल्या शरीराला किमान १३०० मिलिग्रॅम कॅल्शियमची गरज असते. विविध दुग्धजन्य उत्पादने, सोयाबीन, बदाम, सोयादुधापासून तयार केलेले टोफू, हिरव्या पालेभाज्या, मटण यामधून आपल्याला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांनी दररोज सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहून ‘ड’ जीवनसत्त्व मिळवावे. ते हाडांसाठी लाभदायक असते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेट बेअरिंगचे व्यायाम टप्प्याटप्प्याने वाढवत नेल्यास हाडे व स्नायू बळकट होण्यास मदत होते. मद्यसेवन कमी करणे, धूम्रपान व चहा-कॉफीचे प्रमाण घटवणे आदी उपाय केल्यास या काळात महिलांना होणारा कमी होऊन, वेदनामुक्त रजोनिवृत्ती अनुभवण्यास मदत होईल, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.