ज्योतिषशास्त्रात एका राशीतून दुसऱ्या राशीत ग्रहांच्या बदलाला विशेष महत्त्व आहे. कारण एका ग्रहाच्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण १२ राशी आणि ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. नोव्हेंबरमध्ये तीन मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. सर्व प्रथम, ०२ नोव्हेंबर रोजी, बुध ग्रह मंगळवारी कन्या राशीतून बाहेर पडेल आणि तूळ राशीत प्रवेश करेल, त्यानंतर २१ नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

तूळ राशीत बुध या ग्रहाचे संक्रमण काही राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह खूप प्रभावशाली मानला जातो. हा ग्रह बुद्धी, वाणी तसेच करिअरवर प्रभाव टाकतो. अशा स्थितीत जाणून घ्या बुधाचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देईल.

कर्क राशी

बुध या ग्रहाचे संक्रमणाने कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. या राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध सुधारतील. करिअरमध्ये यश मिळेल आणि फायद्याचे नवीन मार्ग उघडतील. या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ राहील.

मेष राशी

तूळ राशीमधील बुध या ग्रहाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील. घरात संपत्ती वाढेल, उत्पन्नाचे मार्ग खुले होतील आणि मान-सन्मान वाढेल.

मकर राशी

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांसाठी सर्व बिघडलेली कामे नीट पूर्ण होतील. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. मात्र, या काळात मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्या राशी

कन्या राशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात बुध राहील. या काळात कन्या राशीच्या लोकांचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. बुध ग्रहाच्या संक्रमणाने कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होतील. यासोबतच करिअरच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.