ख्रिसमस आता काही दिवसांवर आला आहे आणि प्रत्येक जण या सणासाठी जय्यत तयारीत व्यस्त आहेत. जगभरातील कानाकोपऱ्यात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी प्रभु येशूचा जन्म झाला. सर्व देशात हा दिवस साजरा करण्यात येत असला तरी हा दिवस साजरा करण्याच्या पद्धती आणि परंपरा मात्र फारच वेगळ्या असतात. लोक त्यांच्या देशातील परंपरा आणि विश्वासांनुसार ख्रिसमस डे साजरा करतात. भारतात ख्रिसमस ट्री असते, तर काही देशात ख्रिसमस बॉल तर अनेक देशात लॅटिन उत्सव म्हणून हा दिवस साजरा करत असतात. वेगवेगळ्या देशांमधली ख्रिसमस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, हे मात्र नक्की. जगात असे एकूण १२ देश आहेत जिथे ख्रिसमस हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करतात. जाणून घ्या या १२ देशांमध्ये ख्रिसमस डे सेलिब्रेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती.

ऑस्ट्रेलियामधला ख्रिसमस

भारतात दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांत ख्रिसमस डे साजरा केला जातो. पण ऑस्ट्रेलियामध्ये मात्र हा सण चक्क उन्हाळ्यात साजरा करतात. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. भारतात हिवाळ्यात लाल रंगीत लोकरीच्या पोषाखात आणि टोपीमध्ये सांता रेनडिअरवर बसून येतो. पण ऑस्ट्रेलियात हाचा सांता उन्हाळ्याच्या दिवसात आपले पारंपारिक कपडे उतरवतो आणि रेनडिअरऐवजी ६ कांगारूंवरून येतो.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

स्लोव्हाकियाचा ख्रिसम

ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. केक कापून ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. पण स्लोव्हाकिया या देशामध्ये खास पुडिंग बनवून ख्रिसमस डे साजरा करतात. याला लोक्सा पुडिंग असं देखील म्हणतात. याहूनही आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या देशातील ज्येष्ठ मंडळी ख्रिसमसच्या दिवशी पुडिंग बनवल्यानंतर काही भाग छतावर टाकतात आणि मग नंतर कुटुंबातील इतर सदस्य ते खातात.

ऑस्ट्रियन ख्रिसमस

या सणाची खासियत म्हणजे ख्रिसमस ट्री. आपल्यापैकी अनेक जण ख्रिसमस ट्री घरात कार्यालये, मॉल, दुकाने आदी ठिकाणी ख्रिसमसच्या झाडांची सजावट केली जाते. पण ऑस्ट्रियन देशात सोनेरी केसांची मुलंच ख्रिसमस ट्री सजवतात. याला ख्रिस्त असं म्हणतात. या परंपरेमागे देखील एक कारण आहे. ख्रिसमस ट्री सजवणारे सोनेरी केसांची मुलं ही येशूचे रूप मानली जातात. त्यामुळे त्यांच्या हातून या देशातील लोक ख्रिसमस ट्री सजवून घेतात. या देशातील लोक क्रॅम्पस नावाच्या ख्रिसमस डेव्हिलवर देखील विश्वास ठेवतात. या पंरपरेत अशी मान्यता आहे की, ख्रिसमस डेव्हिलवर हा सैतान खोडकर मुलांना मारतो.

आणखी वाचा : Christmas 2021: जाणून घ्या ‘मेरी’ हा शब्द कुठून आला, हॅप्पी ऐवजी ‘Merry Christmas’ का म्हणतात?

अर्जेंटिनाचा ख्रिसमस

या देशातील लोक ख्रिसमस डे च्या दिवशी कागदी कंदील पेटवतात आणि संध्याकाळच्या वेळी ते आकाशात सोडून देतात. हे कागदी कंदीप अगी पॅराशूट फुग्यांसारखे आकाशात उंचच उंच उडत असतानाचा नजारा पाहण्यासारखा असतो. हा दृश्या रात्री कळोख्यात तर आणखी उजळून निघतं.

इंग्लंडमधला ख्रिसमस

ख्रिसमसचं म्हटलं की आठवतं ख्रिसमस ट्री, चॉकलेट्स, गिफ्ट, वेगवेगळे केक, अनेक पदार्थ. या सर्व गोष्टींसाठी लहान मुलं ख्रिसमसची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. या मुलांसाठी सांता सुद्धा गिफ्ट आणतो. पण इंग्लंडमध्ये मात्र ख्रिसमस साजरा करण्याची वेगळीच परंपरा आहे. या देशात ख्रिसमसच्या दिवशी स्टॉकिंग्जमध्ये मिठाईऐवजी चक्क कोळसाच जास्त खोडकर मुलांना दिला जातो. ही परंपरा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे.

ग्रीसमधला ख्रिसमस

ग्रीक लोक ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. असं मानलं जातं की कालीकांतजारोई नावाच्या दुष्ट गोब्लिनची जात, जी भूमिगत असते, ख्रिसमसपर्यंत म्हणजे २५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत १२ दिवस पृथ्वीवर येतात. लोक या दिवसांत एकदा पवित्र पाण्याने क्रॉस आणि पवित्र तुळस धुतात. नंतर तेच पाणी घरात शिंपडतात.

आणखी वाचा : Merry Christmas 2021 : ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट करायचीय? मग या चार सोप्या डेकोरेशन आयडियाज एकदा नक्की वापरा

कॅनडामधला ख्रिसमस

कॅनेडियन ख्रिसमस देखील खूप प्रसिद्ध आहे. वास्तविक, कॅनडा हे सांताक्लॉजचे घर आहे. लोक सांताच्या घरी पोस्टाद्वारे पत्र पाठवतात.

व्हेनेझुएलाचा ख्रिसमस

येथील ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. व्हेनेझुएलामध्ये असलेल्या कराकसच्या राजधानीत, लोक चर्चमध्ये रोलर स्केट्स चालवतात. लोकांना स्केटिंग करावे लागते, त्यामुळे रात्री ८ वाजल्यापासून रस्ते रिकामे होतात.

नॉर्वेमधला ख्रिसमस

ख्रिसमसच्या वेळी नॉर्वे सांताच्या रंगात रंगला आहे. येथे सांता सारख्या लहान बाहुल्यांनी सजावट केली जाते, ज्यांना निसे म्हणतात. त्याचबरोबर नॉर्वेकडून दुसऱ्या महायुद्धात नॉर्वेला मदत करणाऱ्या यूकेचे आभार मानून एक मोठा ख्रिसमस ट्री भेट देण्यात आला आहे. ट्रॅफलगर स्क्वेअरमध्ये लोकांसाठी ख्रिसमस ट्री सजवण्यात आले आहे.

चेक रिपब्लिकमधला ख्रिसमस

ख्रिसमसच्या संदर्भात चेक रिपब्लिकची स्वतःची श्रद्धा आहे. येथे अविवाहित महिला लग्नाच्या इच्छेने ख्रिसमसच्या दिवशी खांद्यावर बूट फेकतात. जर बुटांची बोटे दाराकडे दाखवली तर लवकरच लग्न होईल असा समज आहे.

आणखी वाचा : Christmas 2021 : Amazon ची ख्रिसमस ऑफर! प्रीमियम Chacolate वर सर्वात मोठी ऑफर, गिफ्टिंगसाठी ७५% डिस्काउंट

बेल्जियम मधला ख्रिसमस

ख्रिसमसमध्ये स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात, पण बेल्जियममध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने खास वडी तयार केली जाते. या वडीला पिटा म्हणतात. त्यात नाणी टाका आणि शिजवा. ज्या व्यक्तीला नाणे मिळते ते भाग्यवान मानले जाते.

स्वित्झर्लंडचा ख्रिसमस

स्वित्झर्लंडमध्ये ख्रिसमसच्या दिवशी मिरवणूक काढली जाते. या दिवशी लोक गाईची घंटा घालतात आणि परेडमध्ये सहभागी होतात. या दरम्यान लोक आवाज करतात. असे केल्याने वाईट शक्ती दूर राहतात असे म्हणतात.