मदर टेरेसा हे एक महान व्यक्तिमत्त्व होतं. त्या संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या मदतीसाठी जगल्या. त्यांच्या मानवतेच्या कार्यासाठी जग त्यांना आजदेखील ओळखतं. आनियास गोनिया बोयाचे हे मदर टेरेसांचं मूळ नाव. मदर टेरेसा (Mother Teresa) म्हणजेच Anjezë Gonxhe Bojaxhiu या रोमन कॅथलिक नन होत्या. २६ ऑगस्ट १९१० रोजी त्यांचा जन्म उत्तर मॅसेडोनियातल्या स्कॉपिया येथे झाला होता. यंदा त्यांची १११ वी जयंती आहे. जगाला शांततेचा विचार देणार्‍या आणि त्या दृष्टीने प्रसार करणार्‍या मदर टेरेसा यांना ‘नोबेल पुरस्कार’ तसेच ‘भारतरत्न’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

मदर टेरेसांवर लहानपणापासूनच मिशनरी जीवनाचा खूप प्रभाव होता. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच ‘मानव सेवेसाठी’ कार्य करण्याचं निश्चित केलं होतं. मदर टेरेसा यांनी दया, शांतता, करूणा यांचा प्रसार करतानाच, जगभरातील आबालवृद्धांना मदत केली. वयाच्या १९ व्या वर्षी त्या भारतात आल्या होत्या. मदर टेरेसा यांनी भारतात येऊन काम करण्याचं ठरवलं होत. असं असलं तरी, त्यांनी भारतात येण्यापूर्वी १९२८ मध्ये आर्यलंडच्या ‘इंस्टिट्युट ऑफ ब्लेस्ड वर्जिन मेरी’मध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला होता. नंतर आर्यलंडमधून त्या भारतात आल्या. भारतालाच त्यांनी आपली कर्मभूमी मानलं आणि कोलकात्यामधीलं गरीब, अनाथ आणि रुग्णांची सेवा करण्यात त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

१९२९ मध्ये त्या भारतात आल्या. सुरूवातीच्या काळात त्या दार्जिलिंगमध्ये राहिल्या. त्यांनी बंगाली भाषेचं शिक्षण घेतलं. १९३१ मध्ये त्यांनी पहिली धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यांचं नाव एक्नेस होतं पण भारतात आल्यानंतर त्यांनी टेरेसा नाव निवडलं.

भारतात त्यांनी गोर गरिबांची सेवा केली. या दरम्यान त्यांनी लोरेट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षिका, हेडमिस्ट्रेस म्हणून काम केलं. त्यासोबतच त्यांनी समाजकार्यदेखील सुरू ठेवलं. एक सरकारी अधिकारी ते चर्चपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची सर्वत्र चर्चा झाली. पुढे चर्चकडून त्यांना ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ उघडण्याची परवानगी मिळाली. हळूहळू देश-परदेशात त्यांची कीर्ती पोहचली. १९७९ मध्ये नोबेलचा शांती पुरस्कार त्यांना मिळाला. असे महान कार्य करत असताना अखेर ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मदर टेरेसा यांनी जगभरात ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’च्या साडेचार हजार नन्सचं जाळं उभं केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं कार्य सुरू राहिल्याचं म्हटलं जातं.