Navratri Durga Pooja: दुर्गापूजा हा भारतातील सर्वांत रंगीबेरंगी आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव विशेष धुमधडाक्यात साजरा केला जातो; मात्र मुंबईसारखे महानगरही या काळात अत्यंत उत्साही बनते. शहरभर विविध ठिकाणी भव्य दुर्गा पूजांचे पंडाल , सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उत्सव भरपूर उत्साहाने आयोजित केले जातात. मुंबईमध्येही पर्यावरणपूरक मूर्ती, सांस्कृतिक सादरीकरण, सिंदूर खेळ, धुनुची नाच, पुष्पांजली आणि पारंपरिक बंगाली जेवणाचा आनंद घेता येतो.
मुंबईतील काही पंडाल हे केवळ धार्मिक महत्त्वाचेच नाहीत, तर त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक व कलात्मक योगदानही फार मोठे आहे. येथे शहरातील काही प्रसिद्ध आणि पाहण्यासारख्या दुर्गा पूजेच्या पंडालाची माहिती दिली आहे.
१. नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गोत्सव
नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गोत्सव हे मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध आणि स्टार- स्टडिड् दुर्गापूजा पंडालापैकी एक आहे. एसएनडीटी विद्यापीठ, जुहू येथे असून तिसऱ्या पिढीच्या मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेले हे पंडाल आहे. विशेषतः बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासह प्रसिद्ध आहे. हा उत्सव सहसा पाच दिवस चालतो आणि या काळात विविध बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहतात. या पंडालामध्ये पर्यावरणपूरक दुर्गा मूर्ती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक भोगाचा अनुभव घेता येतो.
२. बंगाल क्लब
शिवाजी पार्क, दादर वेस्ट येथे असलेला बंगाल क्लब हे दुर्गापूजा साजरा करण्यासाठी एक प्रमुख सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे. शहरातील जुन्या पंडालांपैकी एक असलेला हा पंडाल पर्यावरणपूरक मूर्तीच्या हृदयस्पर्शी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथे सांस्कृतिक सादरीकरण, भोग प्रसाद आणि पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येतो.
३. संस्कृती दुर्गा पूजा
१९५३ साली प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय आणि बासु चटर्जी यांनी स्थापन केलेले संस्कृती दुर्गा पूजा पंडाल मुंबईतील सर्वांत जुने पंडालापैकी एक मानले जाते. बोरिवली ईस्ट येथील बीएमसी गार्डनमध्ये आयोजित केलेले हे पंडाल धुनुची नाचसारख्या विविध लोकसांस्कृती कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
४. लोखंडवाला दुर्गोत्सव
प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य हे आयोजित करीत असलेला लोखंडवाला दुर्गोत्सव हा मुंबईतील एक अत्यंत रंगीबेरंगी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा दुर्गापूजा उत्सव आहे. या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित राहतात. येथे पारंपरिक बंगाली विधी, स्वादिष्ट पदार्थ आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा अनुभव घेता येतो.
५. बालकांजी बारी पंडाल
सांताक्रूझ, मुंबई येथे आयोजित बालकांजी बारी पंडाल हे शहरातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि स्टार-स्टडिड पंडाल आहे. मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेले हे पंडाल हजारो भक्तांना आकर्षित करतात. येथे सिंदूर खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, धुनुची नाच आणि पारंपरिक विधींचा अनुभव मिळतो.
मुंबईतील या पंडालामध्ये दुर्गा पूजेला भेट देऊन आपण नुसते धार्मिक अनुभवच नाही, तर सांस्कृतिक आणि कलात्मक समृद्धीही अनुभवू शकतो. पारंपरिक बंगाली जेवण, रंगीबेरंगी सजावट, धुनुची नाच आणि उत्साही भक्तांच्या उपस्थितीमुळे हे पंडाल शहरातील दुर्गापूजेला एक खास ओळख मिळवून देतात.