अंकशास्त्रानुसार, आपण कोणत्याही व्यक्तीबद्दल त्याच्या जन्म तारखेपासून बरेच काही जाणून घेऊ शकता. कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ मानला जातो. या संख्येचा शासक ग्रह शुक्र आहे. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते असे मानले जाते. त्यांच्याकडे पैशाची आणि अन्नाची कमतरता कधी ही नसते. हे लोकं खूप हुशार आणि बुद्धिमान असतात. इतरांच्या मनातील गुपिते त्यांना लगेच कळतात. जाणून घ्या मुलांक ६ च्या लोकांबद्दल अधिक मनोरंजक माहिती.

मूलांक ६ असलेले लोकं श्रीमंत आणि सुंदर असतात. ते सौंदर्याकडेही लवकर आकर्षित होतात. या राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. ते नेहमी राजे-महाराजांसारखे जीवन जगतात. त्यांच्याकडे पैसा आणि मालमत्ता दोन्ही चांगली असते. त्यांना नेहमी एकत्र राहायला आवडते. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. ते नेहमी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात.

या मूल्यकांची लोकं खूप विश्वासनिय आणि शांतताप्रिय असतात. त्यांना स्वत: आनंदी राहायला आवडते आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांनाही आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आहे. या लोकांना संगीत आणि चित्रकलेची चांगली आवड आहे. कष्ट करून ते श्रीमंत होतात. पैसा आणि मालमत्तेच्या बाबतीत त्यांना काही न्यायालयीन खटल्यांनाही सामोरे जावे लागते. ते कला, दागिने किंवा कापडाच्या व्यवसायात किंवा इतर संबंधित कामांमध्ये चांगले काम करू शकतात. चित्रपट, नाटक, सोने-चांदी, हिरे इत्यादींशी संबंधित कामेही त्यांच्यासाठी शुभ असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांचे वैवाहिक जीवन सामान्यतः आनंदी असते. ते स्वभावाने खूप रोमँटिक आहेत. मात्र त्यांचे लव्ह लाईफ तणावपूर्ण आहे. कारण ते नातेसंबंध बांधण्यात खूप घाई करतात. त्यामुळे त्यांना नंतर अनेकदा पश्चाताप करावा लागतो.