डेंग्यू या वरकरणी साध्या वाटत असलेल्या पण जास्त बळी घेणाऱ्या रोगावर लाळेच्या २० मिनिटांच्या चाचणीवरून निदान करण्याची पद्धत वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. यात मानवी लाळेतून २० मिनिटांत डेंग्यूविशिष्ट म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेले प्रतिपिंड शोधून काढले जातात.
द इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइंजिनीयरिंग अँड नॅनोटेक्नॉलॉजी (आयबीएन) या सिंगापूर येथील संस्थेने या चाचणीसाठी उपकरण विकसित केले असून त्याच्या व्यावसायिक वापरासाठी आणखी प्रगती सुरू आहे.
आयबीएन संस्थेचे कार्यकारी संचालक जॅकी वाय यिंग यांनी सांगितले की, आमच्या निदान संचाने म्हणजे उपकरणाने डेंग्यूचे प्रतिपिंड मानवी लाळेतून अगदी सुरुवातीच्या काळातील प्रतिपिंड शोधून काढले आहेत. डेंग्यूचा प्राथमिक व दुय्यम संसर्ग यामुळे त्याचे निदान लवकर व वेळेवर होणे आवश्यक असते व त्यामुळे रुग्णाची चाचणी घेणे आवश्यक असते. दुय्यम संसर्गाचे रुग्ण असतात त्यांना डेंग्यूच्या इतर स्वरूपाच्या विषाणूंचाही संसर्ग होतो व त्यामुळे  डेंग्यूचे प्रमुख लक्षण असलेला ताप व इतर लक्षणे दिसतात.
सिंगापूरच्या राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या मते डेंग्यूचा ताप व इतर स्वरूपाचा हेमोरेजिक ताप हे जगातील सर्व विषाणूजन्य रोगांमध्ये सारखीच लक्षणे म्हणून मानली जातात. या रोगामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. उष्णक टिबंधीय व उपउष्णकटिबंधीय वातावरणात त्याचे प्रमाण जास्त असते. डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रकार सांगितले जातात पण त्यावर अजून लस तयार करण्यात यश आलेले नाही.
 डेंग्यूच्या विषाणूचा अधिशयन काळ हा संसर्गापासून ४ ते १० दिवस असून निदानास वेळ झाला तर धोका निर्माण होतो. लवकर निदान झाले तर पुढच्या गुंतागुंती टळतात. सध्या डेंग्यूच्या संसर्गाचे निदान हे रुग्णाचे रक्त प्रयोगशाळेत नेऊन करावे लागते. त्यात डेंग्यूचे प्रतिपिंड शोधले जातात. डेंग्यूची लाळेच्या मदतीने चाचणी करणारे उपकरण आयजीजी हे डेंग्यूविशिष्ट प्रतिपिंड दुय्यम संसर्गात पटक न ओळखते. रक्त नमुन्यांपेक्षा  लाळ गोळा करणे सोपे पण वेदनामुक्त असते पण यात एक अडचण म्हणजे व्यावसायिक वापर करताना ही लाळ थेट चाचणी संचाला लावणे धोक्याचे असते. कारण त्यामुळे नॅनोकण चाचणीपट्टीला घट्ट चिकटत असतात. लॅब ऑन चिप असे या शोधाचे वर्णन केले जात असून यातील आव्हानांवर वैज्ञानिकांनी गर्भधारणा संचातील आव्हानांप्रमाणेच मात केली आहे. एचआयव्ही व सिफिलीस यांसारख्या रोगावर या चाचणी संचाचा वापर केला जाऊ शकतो. रक्त, लघवी व शरीरातील इतर द्रवांच्या मदतीने झटपट कुठल्याही रोगाची चाचणी करण्याचे संवेदनशील संच तयार करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करीत आहेत.
*२० मिनिटांत डेंग्यूच्या विषाणूच्या प्रतिपिंडांचा शोध घेण्यात यश.
*मानवी लाळेचा वापर केल्याने रक्तापेक्षा सोपी चाचणी.
*व्यावसायिक वापरातील अडचणी दूर करण्याचे प्रयत्न.
*डेंग्यूचा अधिशयन काळ कमी असल्याने प्रसार रोखण्यास निदानामुळे मदत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapid test kit detects dengue antibodies from saliva
First published on: 31-01-2015 at 07:15 IST