रेशन कार्डावर ग्राहकांना किराण्याव्यतिरिक्त इतर अनेक सुविधा दिल्या जातात. या रेशन कार्डमुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळतात, तसेच जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ देखील उचलू शकता. आता रेशन कार्डधारकांना एक विशेष फायदा होणार आहे. तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर तुम्हालाही इंधनाबाबत विशेष सुविधा मिळू शकते. जाणून घेऊया या सुविधेचा लाभ आपण असा उचलू शकतो.

देशात रेशन कार्डावर ग्राहकांना अनेक प्रकारच्या सवलती मिळतात. अशातच झारखंड सरकारने, राज्यात राहणाऱ्या रेशन कार्डधारकांना २६ जानेवारीपासून स्वस्त दारात पेट्रेल दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. यामुळे जवळपास २० लाख लोकांना फायदा होऊ शकतो. झारखंड राज्यात सरकारने पेट्रोल सबसिडी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ रेशन कार्डधारकांना घेता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २६ जानेवारी २०२२पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० लाख लोकांना फायदा होणार आहे.

LIC च्या या योजनेत एकदाच गुंतवणूक करून महिन्याला मिळणार १२ हजार रुपये पेन्शन; जाणून घ्या तपशील

या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे लाल, पिवळे आणि हिरवे रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच रेशन कार्ड खराब झाले असेल किंवा रद्द झाले असेल तर त्यावर लाभ दिला जाणार नाही. सध्या वापरात असलेल्या रेशन कार्डधारकांनाच लाभ उचलता येईल. याशिवाय ज्यांच्याकडे झारखंड राज्य नोंदणीचे दुचाकी वाहन आहे तेच याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला २५० रुपये थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेट्रोल सबसिडी योजनेंतर्गत रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक सदस्याला महिन्याला १० लिटर पेट्रोलवर २५ रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला पेट्रोल खरेदी करताना पंपावर संपूर्ण रक्कम भरावी लागेल आणि महिन्याच्या शेवटी २५० रुपये तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.