सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात पावसाळा कमी होतो. मात्र यावर्षीचा पावसाळा ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबला. अशातच अनेक आजारांचं प्रमाणही झपाट्याने वाढलं. पावसाळा संपल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेले पाणी तसेच राहते. यामुळे डास आणि घाणीचा प्रादुर्भाव जास्त होतो. अशा परिस्थितीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. आज आपण अशाच काही गंभीर आजारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा प्रादुर्भाव विशेषतः ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • डेंग्यू

या महिन्यांमध्ये डेंग्यू या आजाराचा धोका वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. एडिस मादी डासाच्या चावण्याने हा रोग पसरतो. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. डेंग्यू झाल्यावर रुग्णाला ताप येणे, डोळे दुखणे, अंगदुखी, भूक न लागणे, उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • चिकुनगुनिया

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चिकुनगुनिया पसरण्याचा धोकाही असतो. हा रोगदेखील डासांच्या चावण्याने पसरतो. हा आजार झालेल्या रुग्णांना तीव्र ताप येतो. त्याचबरोबर सर्दी, अंगावर सूज येणे अशी लक्षणे दिसतात. तुम्हालाही अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Blood Pressure : वाढत्या वयानुसार पुरुषांचा रक्तदाब किती असावा? पाहा संपूर्ण यादी

  • मलेरिया

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मलेरियाची साथ पसरण्याची भीती असते. मलेरियाच्या रूग्णांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या, घाम येणे अशी लक्षणे दिसतात. याशिवाय रुग्णांना अंगदुखी आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो.

  • विषाणूजन्य आजार

या महिन्यांमध्ये लोकांना विषाणूजन्य आजार होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्याची लक्षणे जवळपास डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारखीच असतात. म्हणूनच बहुतेक लोक व्हायरल तापात गोंधळून जातात. जर तुम्हालाही उलट्या होणे, खूप ताप येणे, नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि दुखणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

  • डोळ्यांचा आजार

इन्फ्लूएंझा विषाणूमुळे डोळ्यांचा आजार होण्याची भीती या कालावधीत खूप जास्त असते. या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांचे डोळे खूप लाल दिसतात. याशिवाय डोळ्यात वेदना आणि जळजळ देखील होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk of serious diseases such as dengue chikungunya malaria viral fever eye disease increases in october and november seek medical advice as soon as these symptoms appear pvp
First published on: 28-10-2022 at 13:43 IST