आज सायंकाळी अमेरिकेमध्ये सॅमसंग गॅलक्सी एस आठचे लाँचिंग होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सॅमसंगची बाजारावरील पकड ढिली झाली होती. नव्या फोनमुळे बाजारात आपण आपले स्थान निर्माण करू शकू असा विश्वास कंपनीला वाटत आहे.  मागील वर्षी गॅलक्सी नोट ७ च्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे सर्व स्मार्टफोन परत मागवण्यात आले होते. परंतु हा नवा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरून गुणवत्तेची परीक्षा पास होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अॅपलच्या आयफोन ७ला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गॅलक्सी नोट ७ घाईघाईने बाजारात आणला. त्यांच्या बॅटरीमध्ये तांत्रिक त्रुटी राहून गेली. त्यामुळे नोट ७ चा स्फोट होऊ लागला होता. यामुळेच कंपनीला अब्जावधीचे नुकसान झाले होते. तसेच सॅमसंगची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती. कंपनीने हे नुकसान भरुन काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पंरतु, त्याच काळात सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जे यॉंग हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या द वर्ज वेबसाइटने ही सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात मोठी कसोटी असल्याचे म्हटले आहे. विश्वासार्हता आणि अद्ययावत तंत्रज्ञान या दोन्ही स्तरावर सॅमसंगने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे असे द वर्जने म्हटले आहे. सॅमसंगला या नव्या सिरीजकडून खूप अपेक्षा आहेत. सॅमसंग गॅलक्सी ८ चे पदार्पण म्हणजे एका नव्या युगाचा आरंभ आहे असे कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.  या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. जीएसएम अरेनाने दिलेल्या वृत्तानुसार गॅलक्सी एस आठला फ्रंट होम बटन नाही, ड्युएल कॅमेरा सेटअप देखील नसल्याचे म्हटले आहे. या फोनच्या लीक झालेल्या इमेजनुसार हा फोन अतिशय स्लिम आहे. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या एस ७ या सॅमसंगच्या सिरिजशी या फोनच्या कडा मिळत्या-जुळत्या आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy s 8 samsung galaxy note 7 new phone launching biggest test ever
First published on: 29-03-2017 at 15:56 IST